महाविकासआघाडी एकत्रच लढणार म्हणणाऱ्यांसाठी शरद पवारांची गुगली!
विशेष प्रतिनिधी
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कायमच त्यांच्या ऐनवेळी घेतल्या गेलेल्या धक्कादायक निर्णयामुळे सर्वपरिचित आहेत. शरद पवार हे नेमका काय निर्णय घेतील याबाबत कुणीही अंदाज बांधू शकत नाहीत. मात्र तरीही महाविकास आघाडी २०२४मध्ये एकत्रच लढणार असल्याचं ठाकरे गट आणि काँग्रेसमधील काही अतिउत्साही नेते ठामपणे सांगत सुटल्याचे दिसून आले आहे. आता या नेत्यांसाठी शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत केलेलं विधान हे गुगलीसारखं ठरत आहे. Will Mahavikas Aghadi fight together in 2024 or not Sharad Pawars indicative statement
अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांनी जेव्हा शरद पवारांना, २०२४ची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसना(ठाकरे गट) एकत्र लढेल काय? आणि यामध्ये वंचित आघाडीही सोबत असेल का? असा प्रश्न विचारला तेव्हा यावर शरद पवार म्हणाले, ‘’वंचित आघाडीशी अजून आमची चर्चाच झाली नाही. वंचित आघाडीशी जी चर्चा झाली आहे ती केवळ कर्नाटकातील मर्यादित जागांबाबत झाली आहे, बाकी कसलीही चर्चा झालेली नाही.’’ असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
याचबरोबर महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही याला उत्तर देताना शरद पवारांनी ’’बाकी आता आम्ही एकत्र लढणार वैगेरे…. आज आघाडी आहे, एकत्र काम करण्याची इच्छा आहे, पण इच्छा जुळणे पुरेसे नसते. जागांचे वाटप त्यामध्ये कुठे काही अडचण आहे का ते पाहणे, आणखी काही हे अजून केलंच नाही तर कसं सांगता येईल.’’ असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात विशेष करून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजपमध्ये जाणार अशा बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय हवेत तरंगत असताना त्यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा देखील जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित दादांना सूचक पद्धतीने इशारा दिला आहे. यांना पक्षात फूट पाडायची ते पाडू शकतात. आम्ही आमची भूमिका घेऊ, असे असे वक्तव्य शरद पवारांनी अमरावतीत केले आहे.
Will Mahavikas Aghadi fight together in 2024 or not Sharad Pawars indicative statement
महत्वाच्या बातम्या
- कुपोषण संपवण्यासाठी राज्य सरकारची अनोखी मोहीम; अन्नाचा दर्जा तपासणाऱ्या ‘AI’ यंत्राचं लोकार्पण
- आसाम युवक काँग्रेसच्या महिला अध्यक्षाला छळणाऱ्या युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांविरुद्ध आसाम पोलिसांची कठोर कायदेशीर कारवाई
- जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा देताना खासदार अमोल कोल्हेंनी दाखविली राजकीय प्रवासाची सूचक दिशा!!
- बुलढाण्याच्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत : राजा कायम राहणार, पण रोगराई पसरण्याची धोका, वाचा पावसाचा अंदाज