विशेष प्रतिनिधी
पुणे: Double-Decker Buses in Pune : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत व्यस्त असणाऱ्या खराडी हिंजवडी आणि मगरपट्टा भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिकेने नवीन उपाययोजना करायला सुरुवात केली. या भागात लोकांची रहदारी जास्त असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि खाजगी वाहन ऐवजी जास्तीत जास्त लोकांना सामावून घेणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी महानगरपालिका आता नवा प्रयोग करणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जीवनरेषा असणारी पीएमपीएल आता डबल डेकर बसेस सुरू करणार आहे. हजारो नागरिक रोज पीएमपीएलने प्रवास करतात. आता ही पीएमपीएल नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ( पीएमपीएमएल) आता स्विच मोबिलिटी या कंपनीसोबत करार करून पुण्यात आधुनिक इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बसची चाचणी करणार आहे. पुढील आठवड्यात खराडी हिंजवडी आणि मगरपट्टा या भागात पुढील सात दिवस डबल डेकर बस चालवली जाणार आहे. चेन्नई वरून या बसेस मागवण्यात आल्या आहेत.
पुण्यात सर्वाधिक लोकांची आवक जावक असणाऱ्या भागात ही डबल डेकर बसची चाचणी केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर केली जाणारी ही चाचणी यशस्वी झाल्यास पुण्यात डबल डेकर बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. या आधीच मुंबई महानगरपालिका क्षेत्रात डबल डेकर बस सुरू आहेत.
या नव्या बसेस इलेक्ट्रिक, वातानुकूलित आणि अत्याधुनिक सस्पेंशन यंत्रणेने सुसज्ज असून, प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव देतील. डिजिटल तिकीट व्यवस्था उपलब्ध असून, या बसेस लंडनच्या बसेसप्रमाणे डिझाइन केल्या आहेत. प्रत्येक बस ७० जागा आणि ४० उभे प्रवासी सामावून घेऊ शकते. १२ कोटी रुपये किमतीच्या या बसेस १४ फूट ४ इंच उंच असून, मेट्रो स्थानकांजवळ कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी स्पष्ट केले की, यापूर्वीच्या एसएलएफ डबल डेकर बसेसच्या देखभालीसाठी मोठा खर्च येत होता. “या नव्या इलेक्ट्रिक बसेसचा देखभाल खर्च तुलनेने कमी असेल,” असे त्यांनी सांगितले.
या सात दिवसांच्या चाचणीच्या निकालावर या बसेस पुण्यातील प्रवाशांसाठी कितपत उपयुक्त ठरतील हे ठरेल. यशस्वी झाल्यास, पीएमपीएमएल आपल्या ताफ्यात लवकरच डबल डेकर बसेसचा समावेश करेल, ज्यामुळे शहरातील आयटी कॉरिडॉरमधील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल.
Will double-decker buses start in Pune?
महत्वाच्या बातम्या
- Subrata Roy’ : सुब्रत रॉय यांच्या मुलाला ईडीने फरार घोषित केले, 1.74 लाख कोटींच्या घोटाळ्यात सहाराविरुद्ध आरोपपत्र
- Vice Presidential election : राहुल गांधी आणि विरोधकांचा मतचोरीच्या मुद्द्यावरून बाहेर बवाल; पण विरोधकांपुढे खासदारांचे संख्याबळ टिकवण्याचे खरे आव्हान!!
- Hockey Asia Cup : भारताने चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव
- Adani Group : अदानी ग्रुप 2032 पर्यंत 5.34 लाख कोटींची गुंतवणूक करणार, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशनवरही फोकस