राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसवरच दुगाण्या झाडणे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सुरूच ठेवले आहे.ममता बॅनर्जी यांचे कौतुक करताना राऊत यांनी कॉँग्रेसच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली. २०२४ च्या राजकीय पटलावर कॉँग्रेस असेल का असा सवाल राऊत यांनी केला आहे. Will Congress be on the political stage in 2024? Question by Sanjay Raut
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसवरच दुगाण्या झाडणे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सुरूच ठेवले आहे.ममता बॅनर्जी यांचे कौतुक करताना राऊत यांनी कॉँग्रेसच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली. २०२४ च्या राजकीय पटलावर कॉँग्रेस असेल का असा सवाल राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ या साप्ताहिक स्तंभात ममता बॅनर्जी यांच्या कौतुकाचे पूल बांधले आहेत. मात्र, त्याचबरोबर संजय राऊत यांनी काँग्रेसच्या घसरणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. २०२४ च्या राजकीय पटलावर तेव्हा काँग्रेस कोठे असेल? ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीला नवी दिशा मिळेल काय? विरोधी पक्षानं एकत्र यायचं ठरलं तर त्या आघाडीचं नेतृत्व कोणी करावं?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘मोदी किंवा शहांनी कितीही ताकद लावली तरी त्यांचा पराभव होऊ शकतो हे प. बंगाल, केरळ व तामीळनाडूनं दाखवून दिलं. मोदी हे नक्कीच लोकप्रिय नेते आहेत, पण त्यांचं निवडणूक जिंकण्याचं व्यवस्थापन निर्दोष नाही. समोरचं कमजोर नेतृत्व, विरोधकांकडं साधनांची कमतरता हेच मोदी-शहांचे राजकीय बलस्थान आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. यातून त्यांनी कॉँग्रेसच्या कमजोर नेतृत्वाकडेच अंगुलीनिर्देश केला असल्याचे मानले जात आहे.
संजय राऊत यांचा हा लेख प्रसिध्द झाल्यावर कॉँग्रेसकडून उत्तर दिले गेले. आपण सामना वाचणेच बंद केले आहे असे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. त्यानंतर मात्र संजय राऊत यांनी पलटी मारत भाजपाविरोधात देशपातळीवर कोणतीही आघाडी उभी राहिली तरी त्याचा आत्मा हा कॉँग्रेसच असेल असे म्हटले.
कॉँग्रेसला लक्ष्य करण्याची राऊत यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी, असे म्हटले होते. याचा अर्थ कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पदावरून पायउतार व्हावे, असा घेतला होता.
Will Congress be on the political stage in 2024? Question by Sanjay Raut
इतर बातम्या
- माजी केंद्रीय गृहमंत्री चाकूरकर यांनी ८६व्या वर्षी हरवले कोरोनाला, डॉक्टरांना दिली ‘ही’ भेट
- कोरोनाने कितीही सोंगं घेऊ द्यात, त्याविरोधातली लस परीणामकारकच
- नेपाळच्या ‘लाल’ पंतप्रधानांना जोरदार झटका, चीनलाही फटका
- इतर राज्यांना ऑक्सिजन देण्यास केरळचा थेट नकार
- राहुल गांधींच्या फोननंतर सुधारली सातव यांची प्रकृती
- लढा कोरोनाविरोधातील : एक देश एक धोरण राबवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकारला आग्रह ; सर्व पक्षीय बैठकीची मागणी