प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही कधी ठामपणे सांगितले नाही. वीर सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात विधिमंडळात एकदा ठराव आणण्याचा विचार झाला, तेव्हा तुम्ही पुढाकार का घेतला नाहीत? का ठराव आणला नाहीत? वीर सावरकर हे आमचे दैवत आहेत. त्यांचे नाव आम्ही अभिमानाने घेतो. पण काँग्रेसचा विरोध म्हणून आम्ही त्यांचे नावही घ्यायचे नाही, हा कुठला न्याय? त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत काहीच योगदान नाही का? वैचारिक विरोध मी समजू शकतो,Why was not a resolution brought against the contempt of Veer Savarkar?; Chief Minister Shindecha asked Uddhav Thackeray
पण आघाडीत एकमेकांच्या भावनांचा आदर करायचा असतो, का नको करायला? आम्ही काँग्रेसच्या भावनांचा आदर करायचा आणि काँग्रेस त्याच्या शिदोरी मासिकात सावरकरांचा उल्लेख माफीवीर करायचे? आणि आम्ही गप्प बसायचे? आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करू शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगितले.
काँग्रेससोबत जाणार नाही. त्याऐवजी मी माझे दुकान बंद करेन, असे ठणकावून सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आहे. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी केलेला द्रोह आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी तुम्ही लाचारी स्वीकारली आहे. हेच तर आमचे दुर्दैव आहे. या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. भ्रष्टाचाराचा काँग्रेसचा रावण जाळायचा आहे,
असे बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यात सांगितले होते. आज त्याच काँग्रेसच्या मदतीने तुम्ही दसरा मेळाव्यात गर्दी करत आहात, चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत तुमचे लोक सहभागी झाले होते. त्यांचा पदर पकडून तुम्हाला चालायला लागत आहे, किती लाचारी करणार!!, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
Why was not a resolution brought against the contempt of Veer Savarkar?; Chief Minister Shindecha asked Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे एकनाथ शिंदेसोबत; तर नातू निहार ठाकरे व्यासपीठावर शिंदेंशेजारी!!
- बिल्किस बानूच्या विषय काढून दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे पवारांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब!!
- चांदीचे धनुष्य, १११ साधूंचा आशीर्वाद; शिंदे गटाचा हिंदुत्वाचा शंखनाद
- शिवसेनेच्या मूळ गीताचा आवाज घुमला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात; अवधूत गुप्ते आणि नंदेश उमप व्यासपीठावर!!