वृत्तसंस्था
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रे उघड करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले. तसेच शरद पवारांनी कितीही प्रमाणपत्रे दिली आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर कितीही हल्ले करायला लावले तरी मी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणारच, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.Why doesn’t Ajit Pawar show disclosure of Jarandeshwar factory documents? Kirit Somaiya’s attack
महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला. ही कारवाई अजित पवारांसाठी मोठा धक्का मानली आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे.
किरीट सोमय्या हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे उपस्थित होते. सोमय्या म्हणाले,
साताऱ्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालकीचा जरंडेश्वर कारखाना ६५ कोटिंना घेतला आणि त्यावर ७०० कोटींचे कर्ज घेतले.शरद पवारांना यासाठी सहकार चळवळ हवी आहे का ? जरंडेश्वर कारखान्याची कागदपत्रे उघड करण्याची हिम्मत अजित पवार का दाखवत नाहीत? असा सवाल सोमय्या यांनी केला.
सहकारी कारखाना खासगी कसा झाला ?
सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीने आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं.
Why doesn’t Ajit Pawar show disclosure of Jarandeshwar factory documents? Kirit Somaiya’s attack
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : कर्नाटकात 150 कुत्र्यांना जिवंत गाडले, नसबंदी करणाऱ्या ठेकेदाराचे पैसे वाचवण्यासाठी अमानुष कृत्य
- मोठी बातमी : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या ASI सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थगिती
- तालिबानने आणखी एक वचन मोडले, काबूलमधील नॉर्वेजियन दूतावास केले काबीज , मुलांची पुस्तके फाडली
- गूड न्यूज ! Gmail मध्ये येत आहे व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलिंगची सुविधा , वापरकर्त्यांचा अनुभव असेल मजेदार