विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे आणि शरद पवार यांची छुपी युती महाराष्ट्रासमोर एक्सपोज व्हायला लागल्यानंतर शरद पवारांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर संवाद साधण्यासाठी लोकांमध्ये जाऊन बोलणार असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी शिंदे – फडणवीस सरकारने काही चुका केल्या, असा दावा पवारांनी केला. या दाव्यावर शिंदे – फडणवीस सरकारचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोचरा सवाल करून पवारांना घेरले आहे. आता तुम्ही सरकारच्या चुका काढता, पण तुम्ही सत्तेवर होतात. सरकारमध्ये होता, तेव्हा मराठा आरक्षण का दिले नाही??, याचे एका वाक्यात उत्तर द्या!!, अशा शब्दांमध्ये चंद्रकांत दादांनी पवारांना टोचले आहे. Why did you not give Maratha reservation when you were Chief Minister?
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दोन्ही समाजाच्या नेत्यांशी परस्पर चर्चा केली. त्यामुळे वाद वाढत गेला. दोन्ही समाजाच्या नेत्यांसोबत एकत्र चर्चा केली असती तर वाद वाढला नसता. सरकारची हीच मोठी चूक होती, असा दावा शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या या टीकेचा चंद्रकांतदादा पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का दिले नाही??, याचे एका वाक्यात उत्तर द्यावे, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिले.
शासन चूक काय होते??, तो नंतरचा विषय आहे. पण शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही?? एका वाक्यात उत्तर द्या. मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही??, हे सांगा. विरोधकच मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. मात्र विरोधक सत्ताधारी या सर्वांनी मिळून मनोज जरांगे यांना समजावले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
जरांगेंनी यावं
मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृहात जेव्हा बैठक बोलावली, तेव्हा शरद पवार आले नाहीत आणि आता या विषयावर बोलत आहेत. पण बैठक घेतल्यावर मनोज जरांगे यांनी आता स्वत: उपस्थित राहिले पाहिजे. मुख्यमंत्री बैठक बोलावतीलच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सगेसोयरे वादातून शासन मागे गेलेले नाहीय. सरसकट आरक्षण देणाची आता मागणी आहे. मातृ आणि पितृ अशी मागणी आहे. ओबीसी समाजाचा म्हणणं आहे की, कुणबी आहे त्यांना कशाला? या दोन्ही मागण्या होताना दिसत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
ते मोदींचं मोठेपण
शरद पवार काय म्हणतील काही माहिती नाही. पण जेव्हा गरज होती, तेव्हा शरद पवार यांनी आपल्याला मदत केली, असं मोदी जाहीरपणे सांगत असतात. हे मोदींचं मोठेपण आहे. शरद पवार यांचं मोठेपण ते मान्यच करत आहेत. त्यामुळे त्यावर पडदा टाकण्याचं काम थोडीच होणार आहे, असंही ते म्हणाले.
Why did you not give Maratha reservation when you were Chief Minister?
महत्वाच्या बातम्या
- BCCI सचिव जय शहा यांची घोषणा; ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना 8.5 कोटींची मदत, 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार
- Pushkar Singh Dhami : अग्निवीरांसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने केली मोठी घोषणा
- US Elections : बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
- एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!