• Download App
    मराठा आरक्षण न देणाऱ्या पवार - ठाकरेंवर जरांगे का बोलत नाहीत??; हे तर हिंदू हितावर बोलणाऱ्यांविरोधात षडयंत्र!! Why are Jaranges not talking about Pawar-Thackarey not giving Maratha reservation

    मराठा आरक्षण न देणाऱ्या पवार – ठाकरेंवर जरांगे का बोलत नाहीत??; हे तर हिंदू हितावर बोलणाऱ्यांविरोधात षडयंत्र!!

    – मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलारांचा गंभीर आरोप Why are Jaranges not talking about Pawar-Thackarey not giving Maratha reservation

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही, किंबहूना ज्यांनी मिळालेले आरक्षण घालवले, त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनोज जरांगे कधीच चकार शब्द काढत नाहीत, उलट ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले, त्यांच्या विरोधातच जरांगे का बोलतात??, असा परखड सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला, तसेच महाराष्ट्रात हिंदूंच्या बाजूने बोलणाऱ्या भाजपाला संपवण्याचे मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

    मनोज जरांगे यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आशिष शेलार यांनी जरांगे यांना बोचरे सवाल केले. आशिष शेलार यांनी आज पत्रकारांशी संवाल साधला. त्यावेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नावंर भूमिका मांडताना आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले की, मराठा समाजाच्या मागणीला भाजपचे संपूर्ण समर्थन असून किंबहुना मराठा समाजाला आरक्षणा देण्याची भूमिका विरोधी पक्षाने केवळ भाषणात मांडली त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केले. जरांगे यांना त्‍यांचा विसर का पडलाय?? जरांगे जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलत आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करताहेत त्यावेळेला आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील, असा थेट इशरा त्यांनी दिला.



    आमदार आशिष शेलार म्हणाले, आता जे स्पष्ट करू इच्छितो की, जरांगे हे या आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा नेतृत्व करतात ते योग्यच, पण याचा अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे आहेत असं मानण्याचे कारण नाही. म्हणून जरांगे म्हणजेच सगळे मराठा आणि सगळेच मराठा दावणीला बांधले जातील, हा जर त्यांचा समज झाला असेल तर तो त्यांनी दूर करावा, हे त्यांना नम्रपणे सांगतो.

    समजाच्या आरक्षणाची भूमिका ते मांडत आहेत. लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. सरकार त्यांच्या भूमिकेवर सकारात्मक विचार करते आहे, पण प्रश्न उपस्थित राहतो की, ज्यांनी आरक्षण दिले, टिकवले, त्याचे फायदे काही विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळाले, त्यांच्यावर ते टीका करतात आणि ज्यांनी आरक्षण दिलंच नाही त्यांच्याबद्दल एक चकार शब्द काढायला तयार नाहीत!! अगदी स्पष्ट सांगायचे झाले, तर शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही जरांगे पाटील साहेब आपण कधी त्यांच्यावर बोललात का?? शरद पवारांच्या समर्थनाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकला नाही, जरांगे पाटील साहेब आपण कधी उद्धवजींवर, शरद पवारांवर, नाना पटोले यांच्यावर कधी बोललात का??, टीका केलीत का??, असा थेट सवाल आशिष शेलार यांनी केला.

    तुम्ही टीका आणि आलोचनाने घालून पाडून कोणाला बोलताय, तर भारतीय जनता पक्षाला!! देवेंद्र फडणवीस यांना!! त्यांनी आरक्षण दिलं कायद्यात रूपांतरित केलं ते सर्वोच्च न्यायालय समोर टिकवलं, त्याचे फायदे आमच्या एका वर्गाला झाले त्यांच्यावर टीका करताय!! मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?? आरक्षणाच्या जरी बाजूला आहात का? आरक्षणाच्या बाजूने प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने आहात का? या भूमिका तुम्ही तपासून घ्या, असा टोला आशिष शेलार यांनी हाणला

     हिंदू हिताचे बोलणाऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र

    आम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहतो एक सलगता एकरूपता दिसते आहे. आधी सुरु होते काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, उबाठा सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यामध्ये आणि तीच काही संस्था, संघटना, अर्बन नक्षल आणि काही आंदोलनकर्ते आणि आता जरांगे पाटील या सगळ्यांच्या बोलण्यात एक वाक्यता, एकरूपता दिसते आहे. ती म्हणजे भाजपला संपवा. प्रत्यक्ष मनोज जरांगे तर हे बोललेच, देवेंद्र फडणवीस यांना संपवा म्हणून. भाजपला संपवा याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हिंदू हिताची गोष्ट बोलणारा माणूस राहूच नये, हिंदुहितासाठी बोलणारा पक्ष वाचू नये, जेव्हा जेव्हा आम्ही हिंदू आहेत, महाराष्ट्राचे विकासाचं राजकारण याच्यावर बोलू याच्यासाठी काम करू, याच्या योजना करू, त्या भूमिका घेऊ, तेव्हा तेव्हा या आंदोलकांचे जे नेते हिंदूंना जाती-जातीमध्ये विभाजित करण्याचे काम करतात, मराठा समाज हे देखील पाहतोय. हे एक मोठे षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. व्यापक हिंदू हिताला सुरुंग लावण्याचे काम जे कोणी करतात ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या रस्त्यावरून भरकटलेत. जरांगे पाटील, जरा आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही शेलार यांनी दिला आहे.

    – राजकीय भूमिका मांडल तर सडेतोड उत्तर देऊ!!

    जरांगे पाटील भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भूमिका ज्या ज्या लोकांनी घेतली, त्या लोकांच्या बद्दल थोडा अभ्यास करा, आम्ही समाजाबरोबरच आहोत, आणि समाज आमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर सकल मराठा समाज आहे या गैरसमज राहू नका, आणि निवडणुकीची भाषा बोलत असाल तर आम्ही तयार आहोत. अशा आम्ही बऱ्याच निवडणुकांमध्ये पराभव ही पचवले आणि विजयी मिळवले. त्यामुळे त्यांनी निवडणुकीची भाषा आम्हाला शिकवू नये. तुम्ही जोपर्यंत समाजाची भूमिका मांडताय तिथपर्यंत तुमचं स्वागत आणि राजकीय भूमिका मांडली, तर सडेतोड उत्तर देऊ, अशा शब्दांत आमदार ॲड आशिष शेलार यांनी ठणकावले.

    Why are Jaranges not talking about Pawar-Thackarey not giving Maratha reservation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस