• Download App
    मावळमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या होत्या हे कोण विसरेल? सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवारांवर पलटवार|Who will forget that bullets were fired at the backs of farmers in Maval? Sudhir Mungantiwar's retaliation against Sharad Pawar

    मावळमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या होत्या हे कोण विसरेल? सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवारांवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लखीमपूर खिरी येथील घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणारे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मावळमध्ये पाण्याची मागणी करणाºया शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या होत्या, ते कोण विसरू शकतो, असा पलटवार मुनगंटीवार यांनी केली आहे.Who will forget that bullets were fired at the backs of farmers in Maval? Sudhir Mungantiwar’s retaliation against Sharad Pawar

    मुनगंटीवार म्हणाले, काही लोकांना सत्तेपासून वंचित राहावे लागत आहे. म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. लखीमपूरची घटना आणि जालियनवाला बाग हत्याकांड या दोन्ही वेगळ्या घटना आहे. आणि चौकशी केल्याशिवाय अशाप्रकारची प्रतिक्रिया देणे योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मावळमध्ये पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या होत्या, ते कोण विसरू शकतो.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षांला 6 हजार रुपये जमा केले. अनेक योजनांमधून शेतकºयांना मदत मिळत आहे. नरेंद्र मोदींना त्यांचा पुतण्या किंवा मुलाला आमदार, खासदार बनवायचं नाही. पंतप्रधानांनी देश मेरा परिवार असे सांगितले आहे.

    काल जागतिक स्तरावर सगळं डाऊन होतं. पण यांची खुर्ची, यांचं डोकं आणि बुद्धीही डाऊन झाली आहे, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केलीआहे.शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत टीका केली होती की, सत्तेचा गैरवापर करुन दडपशाही शुरू आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळणार नाही.

    उत्तर प्रदेशात जालीयनवाला बागसारखी परिस्थिती आहे, देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही. देशातील शेतकरी काही मुद्यांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारविरोधात शांततेत आंदोलन करत आहेत. आता शेतकºयांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आले आहे.

    Who will forget that bullets were fired at the backs of farmers in Maval? Sudhir Mungantiwar’s retaliation against Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा