• Download App
    Who supports Ashok Kharat??; Vanchit Bahujan Aghadi asked a question अशोक खरातला पाठबळ कुणाकुणाचे??; बोचरे सवाल केले वंचित बहुजन आघाडीने

    अशोक खरातला पाठबळ कुणाकुणाचे??; बोचरे सवाल केले वंचित बहुजन आघाडीने

    Ashok Kharat

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अशोक खरात एकटा प्रकरणात नाही. त्याला कोणाचे तरी पाठबळ होत. ते राजकारणी, पोलिस प्रशासनातील लोक, अधिकारी यांचं पाठबळ आणि संरक्षण असल्याशिवाय असे घडूच शकत नाही.एसआयटी आणि सरकारकडे सगळे व्हिडिओ पुरावे आहेत. यामध्ये मंत्री, खासदार, आमदार, समाजकारणात काम करणारी लोक, नेत्यांच्या कुटुंबातील लोक यांच्या माध्यमातून सुद्धा शोषण झाले आहे. या सगळ्या प्रकरणाचा मूळापासून छडा लावला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.Who supports Ashok Kharat??; Vanchit Bahujan Aghadi asked a question

    महाराष्ट्रातील महिलांच्या संरक्षणाचा हा प्रश्न आहे. ज्या महिला कर्मकांडात अडकल्या होत्या, त्यांना न्याय मिळावा त्यांची बदनामी कुठे होऊ नये. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे, असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी सांगितले.



    जे कोणी अशोक खरातला मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबातील लोक या प्रकरणाला संरक्षण देत होते, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांचे चेहरे महाराष्ट्रासमोर आले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

    अशोक खरातला जे कोणी लोक मदत करत होते त्याच्या सोबत महिलांचे शोषण करत होते त्यांच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी.

    महाराष्ट्रात भिती आहे चर्चा सुरू आहे की, मोठ्या-मोठ्या लोकांची नावे प्रकरणात आल्यामुळे भोंदू अशोक खरातला जेलमध्येच मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यानेच फाशी घेतली असेही होऊ शकते, असा आरोप उत्कर्षा रुपवते यांनी केला.

    Who supports Ashok Kharat??; Vanchit Bahujan Aghadi asked a question

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sujat Ambedkar : ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेचा ठेका कुणी दिला? वंचित बहुजन आघाडीचा आरोप- ठाकरेंचे राजकारण केवळ स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी

    Sunil Tatkare : अजितदादांचा पक्ष तटकरे, चाकणकरांमुळे बदनाम; या दोघांनाही गुन्हे दाखल करून अटक करा, शरद पवार गटाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

    ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??; वंचित बहुजन आघाडीचा बोचरा सवाल