• Download App
    वर्क फ्रॉम होम करताना अधिकाऱ्यांनी पासवर्ड दिला आणि क्लार्कने चक्क २१ कोटींना चुना लावला, मुंबईतील पीएफ कार्यालयातील प्रकार उघडकीस|While work from home, the officials gave the password and Clark limed Rs 21 crore, the type of PF office in Mumbai was revealed.

    वर्क फ्रॉम होम करताना अधिकाऱ्यांनी पासवर्ड दिला आणि क्लार्कने चक्क २१ कोटींना चुना लावला, मुंबईतील पीएफ कार्यालयातील प्रकार उघडकीस

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लॉकडाउनदरम्यान घरीच राहण्याचा पर्याय निवडलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रणालीसाठीचे आपले पासवर्ड सिन्हा याला दिले. नंतर ते बदलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे एका क्लार्कने मुंबईतील इपीएफओ कार्यालयात तब्बल २१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. कोविड महामारीच्या काळात लोकांना मदत व्हावी या हेतूनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता आणण्यात आली. याचाच गैरफायदा घेण्यात आला.While work from home, the officials gave the password and Clark limed Rs 21 crore, the type of PF office in Mumbai was revealed.

    मुंबईतील कांदिवली येथील कार्यालयातील हा घोटाळा अंतर्गत लेखापरीक्षणात उघडकीस आलं आहे. चंदनकुमार सिन्हा हा ३७ वर्षीय लिपिक या घोटाळ्याचा मास्टरमार्इंड आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक सुरक्षा संघटनांपैकी एक असून, तिच्याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तब्बल 18 लाख कोटींच्या रकमेचं व्यवस्थापन होते.



    कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील सिन्हा (याने ही अफरातफर केली. त्यानं 817 स्थलांतरित कामगारांच्या बँक खात्याचा वापर करून पीएफच्या रकमेचा दावा केला आणि एकूण 21.5 कोटी रुपये त्यांच्या खात्यात वळवले. या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढून घेण्यात आली असल्याचेही तपासात स्पष्ट झालं आहे. या घोटाळ्यात सिन्हा याच्याबरोबर याच कार्यालयातील आणखी पाच कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे, त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

    जुलै 2021 च्या सुरुवातीला एका निनावी तक्रारीमुळे ही फसवणूक उघडकीस आली. त्यानंतर या घोटाळ्याचा सूत्रधार सिन्हा एका स्थानिक रुग्णालयात दाखल झाला आणि नंतर बेपत्ता झाला. मात्र कांदिवली कार्यालयातील हा घोटाळा उजेडात आल्यानं इतर कार्यालयांमध्येही असे प्रकार झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, ईपीएफओच्या इतर कार्यालयांमध्येही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

    फसवणुकीने काढलेले पैसे ईपीएफओच्या एक निधीतील होते. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला नोंदणीकृत संस्थांनी ठेवलेल्या ठेवीचे पैसे जमा केले जातात. हा पैसा मुख्यत: सरकारी सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो. वैयक्तिक खात्यातील पैशांची अफरातफर झालेली नाही. हे ईपीएफओचं नुकसान झालं आहे; कोणत्याही व्यक्तीचे नाही. हे बँक लुटण्यासारखेच आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

    लॉकडाउनदरम्यान घरीच राहण्याचा पर्याय निवडलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनी कार्यालयीन प्रणालीसाठीचे आपले पासवर्ड सिन्हा याला दिले. नंतर ते बदलण्याची तसदी घेतली नाही. तसेच सिस्टीममधील काही त्रुटींचा त्यानं उपयोग केला. उदाहरणार्थ, पीएफमधून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या दुसऱ्या पडताळणीनंतरच त्याला मंजुरी दिली जाते; पण एक ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांसाठी अशी तरतूद नाही. लेखा परीक्षणातील तरतुदींबाबतही त्याला माहिती होती.

    या कामात त्याला त्याचा सहाय्यक ओंकार वनकर यानं सहकार्य केलं. गरजू आणि मुख्यत: बेरोजगार स्थलांतरित कामगारांकडून 5 हजार रुपये देऊन बँक खाती आणि आधार तपशील मिळवून त्यांनी हा गैरव्यवहार केला. 10-15 वर्षांपूर्वी बंद पडलेल्या मुंबईस्थित कंपन्यांतील कर्मचाºयांच्या नावाने पीएफ खाती उघडण्यात आली. 2014 पूर्वी उघडलेल्या पीएफ खात्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) काढण्याची तरतूद होती आणि पैसे काढताना तो नंबर तयार करणे अनिवार्य असे. नंतर ही सुविधा नव्हती. याचा फायदा घेण्यात आला.

    2006 मध्ये बंद झालेल्या बी. विजय कुमार ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, लँडमार्क ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड, न्यू निर्मल इंडस्ट्रीज, साथी वेअर कॉपोर्रेशन आणि नॅशनल वायर या कंपन्यांच्या नावाचा वापर करण्यात आला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

    दरम्यान, ईपीएफओने अंतर्गत लेखापरीक्षणाची व्याप्ती वाढवली असून, कार्यालयीन प्रणालीच्या वापराबाबतही अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बँकांना ही 817 बँक खाती गोठवण्यासाठी पत्र लिहिले आहे. आतापर्यंत 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मागोवा घेऊन ती वसूल करण्यात आली आहेत.

    यातील आरोपी अधिकाऱ्यांच्या मालमत्ताही जप्त करण्याचा तसंच फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आरोपींच्या पगारातून पैसे वसूल करण्याची परवानगी देणारी सीआरपीसीची तरतूद लागू करण्याचाही ईपीएफओ विचार करत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली आहे.

    While work from home, the officials gave the password and Clark limed Rs 21 crore, the type of PF office in Mumbai was revealed.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस