विशेष प्रतिनिधी
ठाणे : एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.While leaders from Pune and Pimpri Chinchwad are flocking to the BJP, Aba Bagul is in Shinde Sena!!
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पुणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती सभापती आबा बागुल यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
– पुण्यात काँग्रेस फुटली
यावेळी त्यांच्यासह काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बागुल, काँग्रेस युवा शहर चिटणीस कपिल बागुल, पुणे शहर काँग्रेसचे सचिव अभिषेक बागुल, माजी सरचिटणीस हेमंत बागुल, दीपक गावडे, घनश्याम सावंत, विलास रत्नपारखी, जयवंत जगताप तसेच अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
काँग्रेस पक्षाला लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत जो धक्का दिला, त्यातून हा पक्ष अद्याप सावरलेला नाही. सच्चा कार्यकर्त्याला या पक्षात किंमत राहिलेली नाही, त्यामुळेच अनेकांनी शिवसेना आणि भाजपची वाट धरली आहे. आबा बागुल यांनी कायम सर्वसामान्य माणसासाठी काम केले आहे. त्याच भावनेतून ते यापुढेही कार्यरत राहतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
यावेळी पुणे जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे, ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक राजेश मोरे, संजय सोनार, तसेच पुण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
While leaders from Pune and Pimpri Chinchwad are flocking to the BJP, Aba Bagul is in Shinde Sena!!
महत्वाच्या बातम्या
- ज्ञान, साधना आणि संस्कृतीचा संगम ऋषभायन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीसांचे ब्राह्मी लिपीत नाव!!
- World Hindu Economic forum : नवोन्मेष, आत्मनिर्भरता आणि समृद्धीचा भारतीय मार्ग हिंदू नीती अर्थव्यवस्थेच्या विचार पद्धतीत!!
- Pakistan Slam : पाकिस्तान म्हणाला- भारतात मुस्लिम महिलेचा हिजाब काढणे चुकीचे, तिथे मुस्लिमांबद्दल द्वेष वाढला
- Donald Trump : ट्रम्प म्हणाले- ‘टॅरिफ’ हा माझा आवडता शब्द; यामुळे 8 युद्धे थांबवली, अमेरिकेने अपेक्षेपेक्षा जास्त पैसे कमावले