• Download App
    G20 च्या पाहुण्यांना मल्टिप्लेक्स स्टाईल भव्य भारत दर्शन; त्याचवेळी ग्रँड ओल्ड पार्टीचे युरोपात टुरिंग टॉकीज "आकर्षण"!! While Bharat is showcasing its strength in G20, rahul gandhi is on Europe to tour to condemn India

    G20 च्या पाहुण्यांना मल्टिप्लेक्स स्टाईल भव्य भारत दर्शन; त्याचवेळी ग्रँड ओल्ड पार्टीचे युरोपात टुरिंग टॉकीज “प्रदर्शन”!!

    एकीकडे भारतात G20 च्या बड्या पाहुण्यांना भव्य मल्टिप्लेक्स स्टाईल भव्य भारत दर्शन घडविले जात आहेत आणि त्याचवेळी काँग्रेसची युरोपमध्ये टुरिंग टॉकीज सुरू झाली आहे!!, असं खरंच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला घडतं आहे. While Bharat is showcasing its strength in G20, rahul gandhi is on Europe to tour to condemn India

    45 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची G20 ची बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली राजधानी नवी दिल्लीत होत असताना संपूर्ण जगातल्या प्रभावशाली देशांना भारताचे भव्य दर्शन घडावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने भव्य दिव्य उपक्रमांचे आयोजन केले आहे. मूळात
    G20 परिषद फक्त “दिल्ली केंद्रित” न ठेवता परिषदेतील वेगवेगळ्या बैठका भारतातल्या 50 शहरांमध्ये घेतल्या जात आहेत. त्यानिमित्ताने सदस्य राष्ट्रांमधल्या बड्या प्रतिनिधींना भारताचे सामर्थ्य आणि शक्ती दाखवली जात आहे.

    पण एकीकडे हे वैविध्यपूर्ण उपक्रम सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसची टुरिंग टॉकीज मात्र युरोपमध्ये पोहोचली आहे. काँग्रेसचे पुनर्स्थापित खासदार राहुल गांधी युरोपमध्ये आपल्या टुरिंग टॉकीजचा तिसरा अंक सादर करत आहेत. त्यांनी याच टुरिंग टॉकीजचा पहिला अंक इंग्लंडमध्ये केंब्रिज विद्यापीठात सादर केला. त्यानंतर अमेरिकेत सादर केला. आणि आता ते काँग्रेसची टुरिंग टॉकीज पुन्हा एकदा युरोपमध्ये घेऊन गेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी राजकीय मुहूर्त देखील भारतातल्या G20 परिषदेचा निवडला आहे.

    राहुल गांधींनी राजकीय मुहूर्त जरी उत्तम निवडला असला तरी त्यांच्या टुरिंग टॉकीजच्या सिनेमातल्या कथानकात बिलकुलच बदल झालेला नाही. भारतात लोकशाही नाही. लोकशाही संस्थांवर हल्ले सुरू आहेत. भारतात हुकूमशाही प्रवृत्ती विरोधी पक्षांना त्रास देत आहे. भारतात गांधीविरुद्ध गोडसे अशी लढाई आहे. मणिपूर, काश्मीर पेटले आहे. चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आहे. हे तेच डायलॉग आहेत, जे टुरिंग टॉकीजच्या सलग तिसऱ्या प्रयोगात युरोपमध्ये बोलले जात आहेत. या डायलॉगच्या क्रमवारीत देखील बदल झालेला नाही, इतकेच काय पण टुरिंग टॉकीज सिनेमाचा मुख्य नायक राहुल गांधी असताना सॅम पित्रोदा हेच त्यांच्याबरोबर साईड हिरो म्हणून आहेत. पहिल्या दोन्ही टुरिंग टॉकीज मध्येही हेच सॅम पित्रोदा साईड हिरो होते.

    G20 च्या निमित्ताने भारताची शोकेस मल्टिप्लेक्स लेव्हलची होत आहे. बड्या देशांच्या बड्या पाहुण्यांचे स्वागत भारतीय पोशाखातील AI अँकर करणार आहे. वेदकाळापासून महाजनपद – जनपद, जैन, बौद्ध परंपरा ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अशी भारताची 5000 वर्षांची गौरवशाली परंपरा तिच्या तोंडून ऐकण्याची संधी बड्या पाहुण्यांना मिळणार आहे. सिंधू संस्कृतीतील डान्सिंग गर्ल बड्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी हजर असणार आहे. प्रख्यात शिल्पकार राम सुतार आणि अनिल सुतार यांनी ही डान्सिंग गर्ल तयार केली आहे. भारतामध्ये लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचे दर्शन बड्या पाहुण्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे घडविले जाणार आहे.

    भारताची वाटचाल विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वेगाने होत आहे. भारताची अर्थव्यवस्था हा जगासाठी दीपस्तंभ ठरत असल्याची ग्वाही विकसनशील देश वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय अर्थसंस्था देत आहेत. आरोग्य, संरक्षण, तंत्रज्ञान, उत्पादन आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांमध्ये भारताची आंतरराष्ट्रीय रणनीती यशस्वी होत आहे. याची शोकेस G20 च्या निमित्ताने बड्या पाहुण्यांना बघायला मिळत आहे, पण तरी देखील ग्रँड ओल्ड पार्टीच्या टुरिंग टॉकीजचा स्वांत सुखाय प्रयोग युरोपमध्ये सुरू झाला आहे!!

    While Bharat is showcasing its strength in G20, rahul gandhi is on Europe to tour to condemn India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस