विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा आधीचा शेवटचा अर्थसंकल्प मांडताना शिंदे – फडणवीस सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या विविध घटकांसाठी विविध योजना जाहीर केल्या. त्यामध्ये त्यांनी 3 मोफत सिलेंडर देण्याची योजना जाहीर केली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी ही घोषणा आहे.Which families get 3 free cylinders in maharashtra??, which girls education free??, read detailed information!!
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही. या योजनेसाठी काही नियम आहेत. या योजनेतून राज्यातील 56 लाख 16 हजार कुटुंबाना फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्य सरकारने राज्यातील 56 लाख 16 हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे. बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत.
महिलांसाठी नेमक्या काय घोषणा?
सन 2023-24 पासून “लेक लाडकी” योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण 1 लाख 1 हजार रुपये
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1500द रुपये-दरवर्षी सुमारे 46000 कोटी रुपये निधी
दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
पिंक ई रिक्षा : 17 शहरांतल्या 10000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य 80 कोटी रुपयांचा निधी
शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10000 रुपयांवरून 25000 रुपये
राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी 78 कोटी रुपये
रुग्णांची विशेषतः गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी 3324 रुग्णवाहिका
जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर
‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ
लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन
आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10000 रोजगार निर्मिती
मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024 – 25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित 8 लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100 % प्रतिपूर्ती
या निर्णयाचा अंदाजे 2 लाख 5499 मुलींना लाभ-सुमारे 2000 कोटी रुपयांचा भार
Which families get 3 free cylinders in maharashtra??, which girls education free??, read detailed information!!
महत्वाच्या बातम्या
- ICC T20 World Cup : इंग्लडला 68 धावांनी पराभूत करत भारताची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक!
- पेपरफुटी वरून विरोधकांचा दोन्ही सरकारांवर हल्लाबोल, पण महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या काळात झाल्या तरी किती पेपरफुटी??
- गुंडांशी संबंध नकोत, म्हणून अजितदादांनी भरली होती तंबी, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ती खुंटीला टांगली!!
- केजरीवाल सरकारला आणखी एक मोठा झटका, उपराज्यपालांनी ‘ही’ समिती केली बरखास्त