• Download App
    नंदकिशोर चतुर्वेदींना कुठे लपवले?, प्रवीण करणे कुठे आहेत?; सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना सवालWhere are the proficient ?; Question to Uddhav Thackeray of Somaiya

    नंदकिशोर चतुर्वेदींना कुठे लपवले?, प्रवीण कलमे कुठे आहेत?; सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना सवाल

    प्रतिनिधी

    मुंबई : आतापर्यंत संजय राऊतांवर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना देखील टार्गेटवर घेतले आहे. श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत 29 कोटी यांचे मनी लॉंड्रिंग झाल्याचा आरोप करत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांचा त्याच्याशी संबंध काय आहे?, प्रवीण कलमे कुठे आहेत? आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांना कोठे लपवले आहे? असे एकापाठोपाठ एक सवाल केले आहेत. यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उत्तराची अपेक्षा आहे.Where are the proficient ?; Question to Uddhav Thackeray of Somaiya

    किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केले आहेत. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत 29 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. तसेच या कंपनीशी आपले संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

    कोट्यवधींचे मनी लाँड्रिंग

    उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची ‘श्रीजी होम्स’ ही एक रिएल इस्टेट कंपनी आहे. त्यांनी शिवाजी पार्कला करोडो रुपयांची मोठी इमारत उभी केली आहे. 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपयांचे काळे धन मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून यात वापरण्यात आले आहेत. या कंपनीला चालवणारे पार्टनर तुमचे मेव्हणे आहेत आणि दुसरे दोन पार्टनर प्रा. लि. कंपन्या आहेत. त्यामुळे या कंपनीशी तुमचे काय संबंध आहेत हे उद्धव ठाकरे यांनी सांगावं, असे आवाहनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

    चतुर्वेदींना कुठे लपवलेत?

    आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींसोबत अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. फरार असलेल्या चतुर्वेदी यांचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. चतुर्वेदी यांनी करोडो रुपयांचे मनी लाँड्रिंग केले आहे. ठाकरे सरकारने भ्रष्टाचार करुन लुटलेला पैसा पार्क करण्याचे काम केले आहे. त्यामुळे या नंदकिशोर चतुर्वेदींना कुठे लपवले आहे, असा सवाल सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. याचवेळी त्यांनी चतुर्वेदी यांच्या कंपन्यांची यादी देखील सादर केली आहे. आदित्य ठाकरे आणि चतुर्वेदी यांच्या 3 कंपन्या आहेत, त्यामुळे ठाकरे परिवार नंदकिशोर चतुर्वेदींचा वापर करत आहे का, असा गंभीर सवालही त्यांनी केला आहे.

    प्रवीण कलमे कुठे आहे?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणारे प्रवीण कलमे यांच्याबद्दल काही खुलासे केले होते. यांनी माझ्याबद्दल अनेक तक्रारी केल्या, उच्च न्यायालयात अनेक आरोप केले. हा प्रवीण कलमे आज कुठे आहेत, असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. एसआरएच्या सरकारी कार्यालयातून लपून कागद चोरताना त्यांना पकडण्यात आले आहे. एसआरएच्या मुख्य अधिका-यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात अजून का कारवाई होत नाही, ते कुठे गेले आहेत याचा शोध का घेण्यात येत नाही. कलमे हे देश सोडून पळाले आहेत. त्यांना पळून जायला कोणी मदत केली, असा सवालही त्यांनी केला आहे.

    Where are the proficient ?; Question to Uddhav Thackeray of Somaiya

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर