विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फार कमी वेळा बाहेर पडतात त्यातच आता मणक्याचा आजार असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाही. When the Chief Minister is not in the chair, the state should start properly
यावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरुये, याचं श्रेय राज्यपालांना जाते, राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
रावसाहेब दानवेंचा दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद …
मुख्यमंत्री खुर्चीवर नाहीत तरी राज्य व्यवस्थित सुरू आहे. खरं तर आताच राज्य व्यवस्थित सुरू आहे. त्याचं कारण आहे की राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. आता मुख्यमंत्री या राज्याचा खुर्चीवर नसताना राज्य चांगलं चाललं तर याचं श्रेय राज्यपालांना व या राज्यातील शांतता, संयमी आणि सहनशील जनतेला जातं. सरकारला मुळीच नाही…असं ते म्हणाले.
When the Chief Minister is not in the chair, the state should start properly
महत्त्वाच्या बातम्या
- BULLI BAI : जावेद अख्तर म्हणाले – ‘बुल्ली बाई अॅपच्या मास्टरमाईंडला माफ करा…
- नागपूरमध्येही पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद
- “छोट्या परदेश दौऱ्यावर” गेलेले राहुल गांधी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतात परतणार
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी ; लक्षात आले BSF चे कार्यक्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत का वाढवले ते…??