प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हवे होते, त्यानुसार 2.5 वर्षे झाली, आता भाजपसोबत जायला काय हरकत आहे?, असा थेट सवाल शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे.What’s the point of going with BJP after 2.5 years as Chief Minister ?; Question by Deepak Kesarkar
आम्ही आजही उद्धव ठाकरे यांना आमचा नेता समजतो. मात्र, त्यांनी आम्हाला नाकारले आहे. शिवसेनेने भाजपसोबत नैसर्गिक युती करावी, असा आमचा आग्रह आहे. मात्र तरीही उद्धव ठाकरे हे मान्य करायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी,
यात पुढील अडीच वर्षांतही शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असेल, तर तसे त्यांची चर्चा करावी, अन्यथा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमचा गट पुढील निर्णय घेईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, अशी इच्छा होती, तो मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबातील नव्हे तर सामान्य शिवसैनिक व्हावा, असे अपेक्षित होते, असेही आमदार केसरकर म्हणाले.
– शिंदेंना गटनेते पदावरून हटवता येत नाही
आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अवैध ठरवू शकत नाहीत. कारण पक्षातील दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ आमच्या गटाकडे आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र गट स्थापन करूच, तसेच गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांनाही हटवू शकत नाही कारण सर्व आमदारांनी मिळून त्यांची निवड केली होती.
आता त्यांच्याकडे अत्यंत कमी संख्येने आमदारांचे संख्याबळ आहे. तेवढ्या संख्याबळाने ते एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवू शकत नाही, असेही केसरकर म्हणाले. आम्ही झिरवळ यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे, याची आठवण आमदार केसरकर यांनी करून दिली.
What’s the point of going with BJP after 2.5 years as Chief Minister ?; Question by Deepak Kesarkar
महत्वाच्या बातम्या
- शहास काटशह : बंडखोर आमदारांचा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव!!
- एकनाथ शिंदेंचे बंड : शिवसैनिकांना दिले आंदोलनाचे काम, पण पक्षप्रमुखांची भूमिकाच दोलायमान!!
- अस्थिर सरकार : सत्ता जातानाही राष्ट्रवादी – काँग्रेस मंत्र्यांचे तगादे, सह्यांसाठी दबाव, अधिकारी वैतागले, रजेवर गेले!!