विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाविरोधी भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आज ते स्वतः ब्राह्मण समाज संघटनांशी बोलणार आहेत. पवारांनी जाहीर सभेत कविता वाचन करून हिंदूंच्या देवतांचा अपमान केल्याचा आरोप झाला, त्यावरून अभिनेत्री केतकी चितळे हिने पवारांवर टीका करणारी पोस्ट व्हायरल केली. अशा प्रकारे सध्या शरद पवारांवर ब्राह्मण विरोधी असल्याचा आरोप घट्ट होत आहे. अशा वेळी पवारांनी ब्राह्मण समाजातील संघटनांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. मात्र ब्राह्मण महासंघाने हे निमंत्रण नाकारले आहे. What will Sharad Pawar say to Brahmin organizations today?
राष्ट्रवादीच्या इस्लामपूरच्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची चेष्टा केली. तर कोल्हापूरच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाला लक्ष्य करताना पुजाविधी करणे हा ब्राह्मण समाजाचा धंदा आहे, असे वक्तव्य केले. शरद पवारांनी देखील एका सभेत शाहू महाराज-ज्योतिषाचे उदाहरण दिले. एकंदरितच अशा वक्तव्यातून राष्ट्रवादीचे ब्राह्मण समजाबाबतचे मत दिसून येते. पवारांनी ब्राह्मण समाजाबाबत पहिल्यांदा त्यांची भूमिका स्पष्ट करावी, नंतरच आम्ही चर्चेला जाऊ, असे म्हणत ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी शरद पवार यांनी दिलेल्या चर्चेचे निमंत्रण नाकारले आहे.
– राष्ट्रवादीचे काय आहे म्हणणे?
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी ब्राह्मण समाजाविरोधात आहे, असा अपप्रचार केला गेला. जी राष्ट्रवादीची बाजू नाही, भूमिका नाही, असे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल केले गेले. त्याचमुळे ब्राह्मण समाज राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. परंतु झालेले गैरसमज दूर व्हावे, यासाठी शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. आज शनिवारी, २१ मे रोजी ही बैठक पुण्यात होणार आहे, असे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
What will Sharad Pawar say to Brahmin organizations today?
महत्वाच्या बातम्या
- ऐतिहासिक कामगिरी : जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखात झरीनला सुवर्णपदक!!
- 1991 प्रार्थनास्थळ कायदा : नरसिंह रावांनी अडवाणींचे ऐकले असते तर??; स्वामी गोविंददेव गिरीही रावांबद्दल सकारात्मक का बोलले??
- चिंतनानंतरचे धक्के : “हाताला नाही काम”, म्हणत हार्दिक पटेलचा काँग्रेसला रामराम!!
- Supreme Court : मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाची परवानगी
- स्वतः नरसिंहराव पुन्हा आले तरी 1991 चा प्रार्थनास्थळ कायदा बदलतील!!; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे प्रतिपादन