Saturday, 10 May 2025
  • Download App
    ''शरद पवारांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?'' पंतप्रधान मोदींचा नेमका सवाल!What did Sharad Pawar do for the farmers when he was the Agriculture Minister Prime Minister Modi' exact question

    ”शरद पवारांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?” पंतप्रधान मोदींचा नेमका सवाल!

    ”त्यांनी देशभरातील शेतकऱ्याकंडून केवळ….” असंही मोदी म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी 

    शिर्डी : पंतप्रधान मोदींच्या हस्ते काल नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण झाले. यानंतर मोदींनी एका जाहीर सभेला संबोधित करताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली. What did Sharad Pawar do for the farmers when he was the Agriculture Minister Prime Minister Modi’ exact question

    याशिवाय शेतकऱ्यांना केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे काम करत आहे याबाबत माहिती दिली आणि २०१४ अगोदर शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामारे जावे लागायचे आणि आता परिस्थिती कशी बदलली आहे हे देखील सांगितले.

    मोदी म्हणाले,  ”आम्ही शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहोत. मात्र, काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नावाने केवळ आणि केवळ राजकारण केलं.” असं म्हणत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवारांच्या नावाचा उल्लेख न करत त्यांच्यावर टीका केली.

    याशिवाय ”महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषिमंत्री होते. तसा तर वैयक्तिकदृष्ट्या मी त्यांचा सन्मानही करतो, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातील शेतकऱ्याकंडून केवळ हा आकडा लक्षात ठेवा, सात वर्षांत देशभरातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख रुपये कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले, तर आमच्या सरकारने सात वर्षांत एमएसपीच्या रूपात एवढ्याच कालावधीत साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.”

    What did Sharad Pawar do for the farmers when he was the Agriculture Minister Prime Minister Modi’ exact question

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा