• Download App
    Western Maharashtra, Khandesh, Marathwada between April 20-22; Farmers urged to take care of crops!! पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन!!

    पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन!!

    Farmers

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.Western Maharashtra, Khandesh, Marathwada between April 20-22; Farmers urged to take care of crops!!



     

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.

    कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे आणि गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

    Western Maharashtra, Khandesh, Marathwada between April 20-22; Farmers urged to take care of crops!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    रामायण हे राम – जानकीचे संयुक्त चरित्र, ते डोळसपणे वाचावे; “न सांगितलेली सीतेची कथा” पुस्तकाचे प्रकाशन

    साखर, इथेनॉल आणि कांदा प्रश्नांवर केंद्र सरकारचे सकारात्मक निर्णय; महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा!!

    Sunetra Pawar : कांदा निर्यातबंदी हटवण्यासाठी दिल्ली दरबारात हालचाली; अमित शहांसोबत सुनेत्रा पवारांची महत्त्वाची बैठक