दारुड्याने घराचा दरवाजा वाजवल्याने मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याच्या प्रकरणात पुणे न्यायलयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –दारू पिऊन घराचा दरवाजा वाजविल्याच्या राग मनात धरून एकाला कटावणीने मारहाण करून त्याचा खून करणार्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी जन्मठेप आणि 25 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. रोनिन माणिक सरकार (रा. उत्तरकेसपुर ता. कुमारगंज, जि. दखनदिनासपुर, पश्चिम बंगाल) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.West Bengal accused life imprisonment in murder case
युकील मुनदारी (55, रा. सिमोलीया ता. निसचिंतापुर, 24 परगणा, पश्चिम बंगाल) यांचा खून करण्यात आला होता. याबाबत सतीश नामदेव मादळे (48, रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले.
फिर्यादी हे कॉन्ट्रॅक्टर असून भोर येथील ससेवाडी मधील युनिव्हर्सल कॉलेजचे काम त्यांनी जून 2015 पासून घेतले होते. तेथेच त्यांनी कामगारांच्या राहण्यासाठी पत्र्याच्या खोल्या बांधल्या होत्या. तेथे आरोपी रोनिन आणि त्याचे इतर कामगार मित्र राहत होते. त्याच्याच बरोबर राहणार्या सुजलबरोबर त्याचा एक मित्र युकील मुनदारी लेबर कॅम्प येथे आला होता.
28 जुलै 2015 रोजी रात्री अकराच्या सुमारास त्याने लेबर कॅम्प मधील राजू गंवडी याच्या घराचा दरवाजा मद्यधुंद अवस्थेत वाजविला होता. त्याचा राग येऊन रोनिनने कटावणीने मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. न्यायालयात तब्बल सात वर्षे खटला चालला. हवालदार सचिन अडसूळ आणि उमेश जगताप यांनी दोन साक्षीदारांना पश्चिम बंगाल येथून आणून साक्षीसाठी हजर ठेवले.
त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. अॅड. खान यांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी केला. राजगडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक निखिल मगदुम यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक उपनिरीक्षक विद्याधर निचित, अमंलदार मंगेश कुंभार यांनी काम केले.
West Bengal accused life imprisonment in murder case
महत्त्वाच्या बातम्या
- Fadanavis Pendrive Bomb : सरकारी वकील प्रवीण चव्हाण आज सकाळपासून “गायब”!!; पुण्यात पवारांचे निवासस्थान 1 मोदीबागेजवळच चव्हाणांचेही निवासस्थान
- UP Election 2022 : आता म्हणता येणार नाही EVM मध्ये गडबड आहे ! दुर्बिणीने EVM वर लक्ष ठेवत आहेत स्वतः समाजवादी पक्षाचे उमेदवार….
- The Kashmir Files : द काश्मीर फाइल्स रिलीज होणारच ! मुंबई उच्च न्यायालयाचा रिलीजला स्थगिती देण्यास नकार
- पुणे पालिकेकडून ५०० चार्जिंग स्टेशन उभी केली जाणार