महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असून त्यामुळे हवामान खात्याकडून सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. नागपूर आयएमडीचे उपसंचालक एमएल साहू म्हणाले, “पुढील 5 दिवस उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम भागात तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता असून याबाबत इशारा जारी केली आहे.Weather Update North-Central Maharashtra including Marathwada-Vidarbha Could Face Heat Wave for next 5 days, IMD warns
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असून त्यामुळे हवामान खात्याकडून सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. नागपूर आयएमडीचे उपसंचालक एमएल साहू म्हणाले, “पुढील 5 दिवस उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम भागात तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता असून याबाबत इशारा जारी केली आहे.
येत्या काही दिवसांत नागपूरशिवाय महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांसह मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर व मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
IMDच्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम, मध्य (विदर्भसह) आणि पश्चिम भारतात (कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह) पुढील 4-5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. 30 मार्चसाठी 36 पैकी 11 जिल्ह्यांतील विविध भागांत उष्णतेची लाट दर्शविणारा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
जळगावात उष्माघाताने एकाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात एका 27 वर्षीय शेतकरी तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक भाग उष्णतेच्या तडाख्यात आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जळगाव जिल्हा कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील चालू उन्हाळी हंगामातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, जळगाव जिल्ह्यात मंगळवारी 41.8 अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती.
Weather Update North-Central Maharashtra including Marathwada-Vidarbha Could Face Heat Wave for next 5 days, IMD warns
महत्त्वाच्या बातम्या
- महत्त्वाची बातमी : लोकसेवा आयोगाच्या इच्छुक परीक्षार्थी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलता नाही, संधीही वाढणार नाहीत
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, १७ लाख कर्मचाऱ्यांना लाभ
- युती सरकार असताना सारे आलबेल होते? ; नाना पटोले यांचा प्रश्न
- एनसीबीने टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त – पुण्यात मंगळवारी रात्री उशिरा केली होती गोपनीय कारवाई