• Download App
    Weather Forecast : महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार ; IMD कडून अलर्ट जारी । Weather Forecast: Heavy to very heavy in the next four days in Maharashtra; Alert issued by IMD

    Weather Forecast : महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार ; IMD कडून अलर्ट जारी

    मुंबई, पुण्यासह कोकणाला ‘यलो अलर्ट’; चार दिवस ‘अतिमुसळधार’ पावसाचे


    राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गणरायाच्या आगमनानंतर राज्यातील काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, आज आणि उद्या (11, 12 सप्टेंबर) यलो अलर्ट, तर 13-14 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. Weather Forecast: Heavy to very heavy in the next four days in Maharashtra; Alert issued by IMD

    राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. मागील एका आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असून, पुढील काही दिवस पाऊस आणखी जोर धरणार आहे. भारतीय हवामान विभागाने 14 सप्टेंबरपर्यंतचा हवामानाच अंदाज वर्तवला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, याचा परिणाम राज्यात दिसून येणार आहे.

    कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढेल. याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

    आज (11 सप्टेंबर)

    हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आज रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    12 सप्टेंबर

    मुंबई, पुण्याला यलो, रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट

    राज्यात 12 सप्टेंबर रोजीही काही जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    13 सप्टेंबर

    ठाणे, पुण्यासह सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

    कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस तीव्र होणार असून, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक, परभणी, नांदेड, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    Weather Forecast: Heavy to very heavy in the next four days in Maharashtra; Alert issued by IMD

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस