प्रतिनिधी
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आहेत यात काही दुमत नाही, पण पक्ष वाढवण्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचाही खारीचा वाटा आहे हे कबूल कराल की नाही??, असा बोचरा सवाल अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला. शरद पवारांवर मी कोणतीही टीका केली नाही मी फक्त प्रश्न विचारले. सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर टीका केली असली तरी त्या मला बहिण किंवा मुलीसारख्या आहेत, असे वक्तव्यही छगन भुजबळ यांनी बीबीसीच्या मुलाखतीत केले. We set up two stands under NCP’s watch
पण त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेची कहाणी सांगितली. काँग्रेस मधून शरद पवारांना बाहेर काढल्यानंतर नव्या पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह सगळे माझ्या मुंबईच्या बंगल्यावरच ठरले. कारण मी त्यावेळी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होतो. आधीच काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस होती आणि आपणही नॅशनॅलिस्ट काँग्रेस व्हावे असे आम्हाला वाटले. त्यामुळे पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस झाले. पक्षाचे चिन्ह घड्याळ ठरले. ते निवडणूक आयोगाकडे पाठविले, पण निवडणूक आयोगाने त्यावर हे पक्षाचे चिन्ह जनता दलाचे चक्र या चिन्हा सारखेच दिसते. तसा भास होतो, असा आक्षेप घेतला. त्यामुळे मग आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळाला खाली दोन स्टॅन्ड लावले. त्यामुळे ते अलार्म क्लॉक झाले, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत हे खरेच, पण म्हणून गेल्या कित्येक वर्षात फक्त त्यांच्याच मर्जीने निर्णय झाले. आज पक्षातले बहुसंख्य लोकप्रतिनिधी कोणाकडे आहेत यावर निर्णय झाला पाहिजे आणि त्या संदर्भातच निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 80% हुन अधिक लोकप्रतिनिधी अजित पवारांच्या बाजूला आहेत. त्यामुळे निर्णय अजित पवारांच्या बाजूनेच लागेल, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.
We set up two stands under NCP’s watch
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ काय? कसे मजबूत झाले ज्यू? वाचा सविस्तर
- नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता
- अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून??
- ५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!