• Download App
    सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले। water level Increases of Krishna river in Sangli

    सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले

    विशेष प्रतिनिधी

    सांगली :  सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने नदी काठच्या सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या भागातील १५ कुटुंबाचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. water level Increases of Krishna river in Sangli

    आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार येथील ५६ नागरिकांचे महापालिका प्रशासनाकडून तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत येथील नागरिकांना स्थलांतर होणेचे आवाहन करत त्यांना मदतही केली.

    नागरिकांच्या मदतीसाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासन भर पावसात स्पॉटवर नागरिकांच्या मदतीसाठी थांबून आहे. पाणी पातळी वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी तातडीने स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर सुरू केले असून रात्री ११ पर्यंत १६ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे.

    • सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
    • नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा
    • १५ घरातील लोकांचे तातडीने स्थलांतर
    • अनेक नागरिकांचे स्वतःहून स्थलांतर
    • पाणी पातळी वाढते ; स्थलांतरित होण्याचे आवाहन

    water level Increases of Krishna river in Sangli

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना