Song On vaccination : संगमनेर तालुक्यातील एका प्राध्यापकाने लोककलेतून लसीकरणाबाबत जनजागृती केली आहे. लस हीच संजीवनी असल्याचं प्राध्यापकाने सांगितले असून गीतकारसुद्धा लसीकरणाबाबत कशी जनजागृती करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सह्याद्री महाविद्यालय संगमनेरमध्ये प्राचार्य असणारे रोहिदास केरुजी राहणे राहणार वाघापूर यांनी गीताची रचना केली आहे. दिग्दर्शन अभिनेते वसंत बंदाने यांनी केले, तर छायाचित्रण संकलन अनिल कोल्हे यांनी केले आहे. हे गीत सध्या सोशल मीडियावर ते प्रचंड व्हायरल होत असून अक्षय डिजिटलचे अनिल कोल्हे यांनी याचे चित्रीकरण केले आहे. सध्या कोणाच्या लसीकरणाची किती गरज आहे, हे त्यातून दाखवण्यात आले आहे. या गीताला तरुणाईकडून मोठी पसंती मिळत असून, आबालवृद्धदेखील हे गीत आवडीने पाहत आहे. त्यामुळे या गीताची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. WATCH Vaccine is a lifeline Ahmednagar professor awareness Song On vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- होत्याचे नव्हते झाले, हिंमत देखील तुटली; चक्रीवादळावर अभिनेत्री दिव्या दत्ता यांना दुःख्र
- नागपुरातील भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन बिर्याणीची मेजवानी ; कोरोनाच्या काळात भूतदयेचा उपक्रम
- रामभक्त कधीच खोटे बोलत नाही …जय श्री राम!
- कोरोनाची दुसरी लाट ओसरणार कधी? ; तिसऱ्या लाटेचेही शास्त्रज्ञांकडून भाकीत
- अपयश मान्य करणे राजकीय नेते, नोकरशहांच्या रक्तातच नाही – उच्च न्यायालयाची खंत