• Download App
    WATCH : हौसेला मोल नाही, पाच एकर द्राक्ष बाग मोडून मुलासाठी उभारले क्रिकेट स्टेडियम । Watch Solapur farmer build Cricket stadium in his own grapes farm for his son

    WATCH : हौसेला मोल नाही, पाच एकर द्राक्ष बाग मोडून मुलासाठी उभारले क्रिकेट स्टेडियम

    Solapur farmer build Cricket stadium : स्वतःच्या मुलाचा क्रिकेटचा छंद पूर्ण करण्यासाठी पंढरपूर जवळच्या अनवली येथील एका शेतकर्याने पाच एकर द्राक्ष बाग काढून सर्व सोयीनियुक्त जिल्हा स्तरीय क्रिकेटच मैदान तयार केलं आहे.  दोन  महिन्यात  क्रिकेटचे हे मैदान खुले होणार आहे. या मैदानासाठी सुमारे 50 लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. अनवली येथील शेतकरी राजेंद्र सूर्यवंशी  यांचा मुलगा  अभियश हा दहावी मध्ये शिक्षण घेत आहे. लहन पणापासूनच त्याला क्रिकेटची आवड आहे. त्याच्यातील या  सुप्त गुणांची आवड ओळखून वडील राजेंद्र सूर्यवंशी यांना  त्याला कोल्हापूर येथील कोच डॉ. इब्राहिम पटेल यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवले आहे. गेल्या तीन वर्षापासून तो सराव करत आहे. दोन वर्षापूर्वी राज्स्तरीय झालेल्या क्रिकेट स्पर्थेत नंदूरबार संघातून त्याने उत्कृष्ठ कामगिरी केली होती. सध्या लॉकडाऊनमुळे अभिनेष गावी आहे. त्यामुळे त्याचा क्रिकेटचा सराव बंद आहे. हीच अडचण ओळखून राजेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या घराजवळ असलेली  पाच एकर द्राक्षबाग काढून त्या ठिकाणी क्रिकेटच मैदान तयार केले आहे. या मैदानात आठ खेळपट्टया आहे. त्यामध्ये मॅचसाठी पाच खेळपट्टया तयार केल्या आहेत. संपूर्ण मैदानावर लॉन तयार करण्यात आले आहे. मैदानावर 300 प्रेक्षकांसाठी गॅलरी तयार करण्यात येणार आहे. खेळाडूसाठी स्वतंत्र पॅव्हेलियनदेखील तयार करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारचे प्रथमच मैदान तयार होत असल्याने स्थानिक क्रिकेट खेळाडूंसाठी ही पर्वणी ठरणार आहे. Watch Solapur farmer build Cricket stadium in his own grapes farm for his son

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका