• Download App
    WATCH : 25 वर्षीय तरुणाने माउंट एव्हरेस्टवर फडकवला वसई विरारचा झेंडा । watch 25 year old Mumbai Youth Successfully climb on Mount Everest

    WATCH : 25 वर्षीय तरुणाने माउंट एव्हरेस्टवर फडकवला वसई विरारचा झेंडा

    Mount Everest : वसईच्या 25 वर्षीय तरुणाने माऊंट एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तसेच वसई विरार शहर पालिकेचा झेंडा फडकवला आहे. तब्बल साठ दिवसाचा प्रवास करून हर्षवर्धन जोशी या तरुणाने शिखरावर चढण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. शिखर चढण्यासाठी त्यांनी गेल्या काही चार वर्षांपासून तयारी चालू केली होती तर शिखर चढत असताना त्यांना मध्येच काही हजारो किलोमीटर वर कोरेानाची देखील लागण झाली. काही दिवस त्यांना विलगीकरण करण्यात आले होते. परंतु त्यांनी शिखराचा प्रवास करण्या अगोदर त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे त्यांना जास्त त्रास न जाणवता कमी वेळेतच कोरोनावर मात केली. हर्षवर्धन जोशी हे आयटी इंजिनिअर असून ते अनेक कंपन्यांचा अम्बॅसेडर आहेत असे त्यांनी सांगितले आहे. सरावासाठी त्यांना अनेक ठिकाणी जावे लागत होते, तर विरार शहरातील सुप्रसिद्ध जीवदानी मंदिर तसेच तुंगारेश्वर डोंगराचा व समुद्रकिनारी जाऊन ते आपला सराव करत असत, असे त्यांनी बोलताना सांगितले. watch 25 year old Mumbai Youth Successfully climb on Mount Everest

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप