Birthday On street using Sword : वाढदिवस म्हटलं की रस्त्यावर गाडी लावून केक कापण्याचं नवं फॅड आजकाल तरुणांच्या डोक्यात शिरलय.रात्री अपरात्री रस्त्यावर आपल्या भाईचा तलवारीने केंक कापून बड्डे साजरा करण्यात या तरुणांना मोठं थ्रील केल्यासारखं वाटतं.मात्र, खामगाव शहरात अशाच पाच जणांचे पोलिसांनी बारा वाजवले आहेत.रस्त्यावर गाडी लावून केक कापल्याने पोलिसांनी त्यांना चांगलाच इंगा दाखवला आहे. पोलिसांनी वाढदिवस साजरा करणाऱ्या या 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. खामगाव शहरातील सुदर्शन चौकात काही लोक एकत्र जमून वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली. माहिती मिळताच रात्री पेट्रोलिंगसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी सुदर्शन चौकात तातडीने पोहोचले. त्या ठिकाणी 5 जण रस्त्यावर गाडी आडवी लावून गाण्याच्या ठेक्यावर तोंडाला मास्क न लावता डान्स करीत केक कापत असल्याचे पोलिसांना आढळले. यावेळी पोलीस पोहोचल्याचे लक्षात येताच सर्व जण पळून जात असतांना पोलिसांनी बर्थडे बॉय रोहन संजय बामणेट याला तलवारीसह अटक केली तर चार जण पळून गेले. या प्रकरणी बर्थडे बॉय रोहन सह 5 तरुणा विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. Watch Police Detained Youth under Arms Act In Buldana Who celebrate Birthday On street using Sword
महत्त्वाच्या बातम्या
- कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या 5600 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करणार बँका, पीएमएलए कोर्टाने दिली मंजुरी
- चिंताजनक : जगात वुहानसारख्या 59 प्रयोगशाळा, विषाणू लीक होण्याच्या दुर्घटनांचा धोका वाढला
- ट्विटरचा यू-टर्न : सरसंघचालकांसह अनेक नेत्यांच्या खात्यावर ब्लू टिक पुन्हा बहाल, फॉलोअर्सही वाढले
- GST Collection : मे महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये 65 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत किती आले जाणून घ्या
- Edible Oil Price : महागड्या खाद्यतेलापासून लवकरच सर्वसामान्यांना दिलासा, आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण