• Download App
    WATCH : मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला पहिल्यांदाच जोडले विस्टाडोम कोच । WATCH Mumbai Pune Express Gets New Vistadome Coaches, become Passengers Attraction

    WATCH : मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला पहिल्यांदाच जोडले विस्टाडोम कोच

    Vistadome Coaches : एलएचबी रॅक व व्हिस्टाडोम कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनची पहिली फेरी दि. २६.६.२०२१ पासून सुरू झाली. एलएचबी कोचसह मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेषची पहिली फेरी दि. २६.६.२०२१ रोजी सुरू झाली. विशेष म्हणजे या मार्गावर प्रथमच व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे ज्यामुळे प्रवाशांना निसर्गरम्य सौंदर्याचा आणि अनुभवाचा आनंद लुटता आला. व्हिस्टाडोम कोचमधील सर्व ४४ सीटस बुक होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास सेल्फी लावलेल्या सेल्फी पॉईंटवर प्रवाशांनी सेल्फी घेतली. या प्रसंगी प्रवाशांनी कोचच्या आतील भागाप्रमाणे दिसणारा केकही कापला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारे म्हटले की, “मुंबई-पुणे मार्गावर, विषेश डेक्कन एक्स्प्रेसमध्ये पारदर्शक आणि मोठ्या खिडक्या असलेला व्हिस्टाडोम कोच प्रवासाचा आनंद वाढत आहे. यामध्ये प्रवास करणारे प्रवासी आपले सुखद अनुभव सांगत आहेत. प्रवाशांच्या जागतिक दर्जाच्या अनुभवासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे.” श्री. उमेश मिश्रा जे आपल्या पत्नी व मुलासमवेत प्रवास करीत होते त्यांनी फक्त परदेशात उपलब्ध असलेल्या व्हिस्टाडोम कोच येथे सुरू केल्याबद्दल माननीय रेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल जी यांचे आभार मानले. मोठ्या खिडक्या आणि बदलानुकारी/हलु शकणा-या आसनांमुळे त्यांच्या मुलास या प्रवासाचा पूर्णपणे आनंद घेता आला. दुसर्‍या प्रवाशाने सांगितले की, तो मुंबई आणि पुणे दरम्यानचा नियमित प्रवासी असून व्हिस्टाडोम कोच जोडल्याने भोर घाटातील प्रवास अधिक आनंददायक होईल. प्रथमच व्हिस्टाडोममध्ये प्रवास करणार्‍या कु. सायली म्हणाल्या की त्यांनी मोठ्या खिडकीच्या पॅनेलमधून या दृश्यांचा आनंद लुटला आणि पावसाळ्यातील हिरवळीमुळे हा आनंद द्विगुणित झाला. या मार्गावर हा कोच सुरू केल्याबद्दल त्यांनी भारतीय रेल्वेचे आभार मानले. ठरलेल्या वेळेत ही रेल्वेगाडी पुण्यात पोहोचली. प्रवासी माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधारीजवळ), उल्हास नदी (जांबरूंगजवळ), उल्हास खोरे, खंडाळा, लोणावळा येथील भाग आणि दक्षिण पश्चिम घाटावरील धबधबे, बोगद्यांजवळून जाताना निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकतील.  WATCH Mumbai Pune Express Gets New Vistadome Coaches, become Passengers Attraction

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले

    पडळकरांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!