Minister Rajendra Shingane : शेतकऱ्यांनी कर्ज माफी होईलच या आशेवर राहू नये, कारण सध्या सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे, मात्र भविष्यात सुधारणा झाल्यावर राहिलेली कर्जमाफी होईल, असे वक्तव्य राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती , ही कर्जमाफी जाहीर करत असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन लाखापर्यंत ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती.आणि ही रक्कम जमा करत असताना कोरोना चे संकट देशासह महाराष्ट्रावर आले.या कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आणि अनेक उत्पन्नाचे मार्ग देखीक मागील दिड ते दोन वर्षांमध्ये बंद आहे.त्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट निर्माण झालीय.त्यामध्येच केंद्राकडून जीएसटीची रक्कमही मिळालेली नाही, त्यामुळे राज्यांमध्ये आर्थिक टंचाई निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारची इच्छा असतानासुद्धा शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देऊ शकलो नाही. भविष्यात राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर कर्ज माफी करण्यात येईल, परंतु सद्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल आणि आपण बँकेचे कर्ज भरायचे नाही, या मानसिकतेमध्ये शेतकऱ्यांनी राहू नये, असे वक्तव्य डॉ शिंगणे यांनी केलंय. सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे आले होते. त्यावेळी त्यांनी विधान केलेय. बुलडाणा जिल्ह्यातील 20 हजारच्या वर शेतकरी अजूनही कर्ज मुक्ती पासुन वंचित आहे.या विधानामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून खरिपाच्या तोंडावर कर्जमाफी होऊन पीक कर्ज मिळण्याच्या आशा पुसत झाल्या आहेत, त्यामुळे पेरणी कशी करावी या विचारात आता शेतकरी पडलेत. WATCH Maha Minister Rajendra Shingane Says Farmers should Not Wait For Loan Waiver Scheme
महत्त्वाच्या बातम्या
- Covid Alarm : ब्रिटिश शास्त्रज्ञांनी बनवला कोविड अलार्म, आता तपासणीशिवाय 15 मिनिटांत होईल कोरोनाग्रस्तांची ओळख
- बसपाचे बंडखोर आमदार अखिलेश यादवांना भेटले, पक्ष प्रवेशाच्या चर्चांना उधाण, मायावतींना मोठा धक्का
- Antilia Case : मनसुख हिरेन हत्येप्रकरणी NIA कडून दोन जणांना अटक, 21 जूनपर्यंत कोठडी
- मुजोर चीनला आर्थिक आघाडीवर उत्तर, 43 टक्के भारतीयांकडून वर्षभरात एकाही चिनी वस्तूची खरेदी नाही
- कोरोना लसीमुळे देशात पहिला मृत्यू झाल्याचा सरकारी समितीचा खुलासा, लस घेतल्यावर कोणती लक्षणे गांभीर्याने घ्यावी, वाचा सविस्तर…