• Download App
    परप्रांतीय मजुरांना उपासमारीने मरू द्यायचे होते काय? काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची टिका|Want to starve foreign workers to death? Criticism of Congress spokesperson Gopal Tiwari

    परप्रांतीय मजुरांना उपासमारीने मरू द्यायचे होते काय? काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांची टिका

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’ मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय, असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनाविषयी ते बोलत होते. Want to starve foreign workers to death? Criticism of Congress spokesperson Gopal Tiwari

    अपयशी पंतप्रधानांना गरीबांची लोक संख्या कमी करूनच दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे काय? असा सवालही त्यांनी केला. वास्तविक कोरोना काळात ही केंद्राने महाराष्ट्र राज्याची हक्काची जीएसटी महसूली रक्कम थकवली होती.



    इतर देशात रोजंदारीवर अवलंबून असणाऱ्यांना दिली जाणारी बँक खात्यातील थेट मदत लक्षात घेता मोदी सरकारने किमान ६,००० रक्कम त्यांना देण्याची मागणी काँग्रेसने वारंवार केली होती. मात्र किमान पैसेही जमा न करता, त्यांना आहे तिथे महिन्यापेक्षा अधिक काळ डांबून ठेवण्याचे केंद्रांचे धोरण अमानवीय होते, असे तिवारी म्हणाले.

    Want to starve foreign workers to death? Criticism of Congress spokesperson Gopal Tiwari

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस