प्रतिनिधी
सांगली : वाळवा गावातील विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेइतके पाणी या गावात होते. घरातील सर्व वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांचे योग्य पुनर्वसन करावे अशी मागणी राज्य सरकारकडे करू, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Walwa,Sangli:Everything in their house,including the house is damaged due to MaharashtraFloods.
ते म्हणाले की, काही घरांची पडझड झाली आहे. शेती आणि पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. मनुष्यहानी टळली, हेच सुदैव. ७० एकर जागेत पुनर्वसन करण्यात यावे अशा स्थानिकांच्या मागण्या आहेत. आपल्या सर्व मागण्या राज्य सरकारकडे मांडण्यात येतील.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार संजयकाका पाटील, सदाभाऊ खोत, पृथ्वीराजबाबा देशमुख हे सारेच माझ्यासोबत या पाहणीच्या वेळी उपस्थित होते. असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
– केंद्र सरकारचे आभार
ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशात २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. यामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे! आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना सुद्धा १० टक्के आरक्षण या प्रवेशात देण्यात आल्यामुळे त्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळेल. आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.