विशेष प्रतिनिधी
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना देखील विठ्ठल नामाची गोडी लागली आहे . विठुरायाच्या भक्तीत बिग बी लीन झाले आहेत . कोट्यवधी वारकरी भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या विठ्ठलाच्या भक्तीत अनेक वर्षांपासून अमिताभ लिन झाल्याचे पाहायला मिळत आहे. Vitthal is gracious to all
बिग बी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फोटो ट्विट करून विठ्ठलाप्रती भक्ती जागृत केली. या पूर्वी ही त्यांनी प्रत्येक एकादशीला मुंबईच्या मंदिरांमधील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो शेअर करून प्रार्थना केली आहे.