• Download App
    धुळ्यात साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना- भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी ; शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू । Violent clashes between Shiv Sena and BJP workers after the results of Sakri Nagar Panchayat elections in Dhule; Shiv Sena activist's sister dies

    धुळ्यात साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना- भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी ; शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू

    साक्री नगरपंचायतीत गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता राखून असलेल्या नाना नागरे यांनाही निवडणुकीत अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. Violent clashes between Shiv Sena and BJP workers after the results of Sakri Nagar Panchayat elections in Dhule; Shiv Sena activist’s sister dies


    विशेष प्रतिनिधी

    धुळे : धुळ्यातील साक्री नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात गेल्यानंतर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.दरम्यान या विजयानंतर भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते.तसेच यावेळी तेथून जाणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला.

    दरम्यान शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू झाल्याने वातावरण तापलं आहे.या प्रकरणात विजयी उमेदवार व भाजपा कार्यकर्ते यांचा समावेश असल्याचा आरोप आहे.साक्री नगरपंचायतीत गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता राखून असलेल्या नाना नागरे यांनाही निवडणुकीत अपयशाला सामोरे जावं लागलं आहे.



    केवळ चार जागा शिवसेनेला जिंकता आलेल्या आहेत.भाजपने मात्र ११ जागांवर विजय मिळवत आपला झेंडा नगरपंचायतीवर फडकवला आहे. साक्री नगरपंचायतीत भारतीय जनता पक्षाने ११, शिवसेनेने ४, काँग्रेस पक्षाने १ आणि अपक्षाने एक जागा जिंकली आहे.

    दरम्यान यावेळी विजयी उमेदवार आणि शिवसेनेचे पराभूत उमेदवार यांच्या परिवारातील सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.मात्र यावेळी त्यांनाही मार बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या .दरम्यान गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    मोहिनी नितीन जाधव असं या महिलेचं नाव आहे.दरम्यान मोहिनी जाधव यांचे नातेवाईक संतप्त झाले असून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जर गुन्हेगारांना अटक नाही झाली तर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांकडून देण्यात आला आहे.

    Violent clashes between Shiv Sena and BJP workers after the results of Sakri Nagar Panchayat elections in Dhule; Shiv Sena activist’s sister dies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना