• Download App
    विनायक राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा; ब्राह्मण समितीचा इशारा।  Vinayak Raut should apologize, otherwise Agitation on ‘Matoshri’; Warning of Brahmin Committee

    विनायक राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा; ब्राह्मण समितीचा इशारा

    वृत्तसंस्था

    मुंबई : शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा काढू, असा इशारा ब्राह्मण समाज समन्वय समितीने दिला आहे. Vinayak Raut should apologize, otherwise Agitation on ‘Matoshri’; Warning of Brahmin Committee

    “शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही” असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असे संतापजनक वक्तव्य करून समस्त ब्राह्मण समाजाचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केल्याचा आरोप ब्राह्मण समाज समन्वय समितीने केला.



    शिवसेना पक्षातर्फे व शिवसेनेच्या नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत तसेच पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे, असे ब्राह्मण समाज समन्वय समितीने म्हटलंय.

     Vinayak Raut should apologize, otherwise Agitation on ‘Matoshri’; Warning of Brahmin Committee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !