• Download App
    विनायक राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणाले -नारायण राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेतVinayak Raut attacked again, said - Narayan Rane is still in the role of green man

    विनायक राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणाले -नारायण राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत

    राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत आहेत, हा स्वभाव जाणार नाही. ही विकृती आहे, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी केला.Vinayak Raut attacked again, said – Narayan Rane is still in the role of green man


     विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे . राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत आहेत, हा स्वभाव जाणार नाही. ही विकृती आहे, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी केला.

    पुढे विनायक राऊत म्हणाले की ,”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे लोकहिताची कामं करत आहेत, त्यांना रणनीती आखण्याची गरज नाही. शिवसेनेला वाडीपर्यंत वाढवू, काही जरी झालं तरी कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. जनआशिर्वाद यात्रेबद्दल विश्लेषण केलंय, 75 गाड्या मुंबईतून नेल्या. स्थानिकांचा प्रतिसाद नव्हता”



    तसेच राऊतांनी आवाहन केलय की ,”या नौटंकीनंतर कोकणात राणेयुक्त राडेबाज विकृती फोफावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांनी सावध राहावं.”

    चंद्रकांत पाटलांसारख्या माणसाने असं वक्तव्य करता कामा नये. केंद्राच्या सूचनेला हरताळ फासण्याचं काम केलं जात आहे. गर्दीमुळे कोरोना वाढतोय, याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप करत, राऊत यांनी भाजपच्या मंदिरांबाबतच्या आंदोलनावर टीका केली.

    न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा जो कुणी प्रयत्न करेल, त्याला कोर्ट शिक्षा देईल.

    Vinayak Raut attacked again, said – Narayan Rane is still in the role of green man

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Adani-Pawar : सुप्रिया सुळे म्हणाल्या- गौतम भाई मोठ्या भावासारखे, अदानी म्हणाले- शरद पवार माझे मार्गदर्शक, तर अजितदादा म्हणाले- मोठं झाल्यावर लोक टीका करतात

    मुंबईत “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा “उदार’ झाला; शरद पवारांच्या पक्षाला एकावर भोपळा दिला!!; मागितल्या 52, दिल्या 10!!

    62 विरुद्ध 9 : मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित आघाडीला ठरविली पवारांच्या राष्ट्रवादी पेक्षा सहा पट भारी; निवडणुकीच्या राजकारणात पवारांची किंमत घसरली!!