विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : संतोष देशमुख खून प्रकरणातील कथित सहभागावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र त्यांचा राजीनामा कधी होणार याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.विशेष तपास पथकाचा ( एस आयटी) अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बद्दल निर्णय होईल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
विखे पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन. घेतलं त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतान त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत हे वक्तव्य केलं आहे.
अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर विखे पाटील म्हणाले, दोन पवार एकत्र यावे न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. कोणी काय साकडे घालावे त्यांची इच्छा आहे.
दरम्यान मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून कोणीही नाराज नाही. जल संपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही या खात्यात काम करण्यास खूप वाव आहे, नदी जोड प्रकल्प, तसेच तुटीचे गोदावरी खोरे यात काम करण्यास चांगला वाव आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Vikhe Patil said when Dhananjay Munde’s resignation will happen
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!
- INDI alliance : नेतृत्व पदासाठी सर्कस सुरू; ममतांचे नाव पिछाडीवर, अखिलेश यादवांचे नाव आघाडीवर!!
- South Korea : दक्षिण कोरियात विमान अपघात, 179 जणांचा मृत्यू; लँडिंगदरम्यान चाके उघडली नाहीत, भिंतीला धडकताच मोठा स्फोट