• Download App
    vijay wadettiwar ठाकरे महाविकास आघाडीत राहण्याची नाही गॅरेंटी

    Vijay wadettiwar : ठाकरे महाविकास आघाडीत राहण्याची नाही गॅरेंटी; पण अजितदादांना महायुतीतून हाकलण्याच्या डावाचा वडेट्टीवारांचा दावा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स महायुतीपेक्षा चांगला झाल्यावर आघाडीच्या नेत्यांमध्ये जोश भरला. त्यातून सत्तेची खेचाखेची सुरू झाली. या खेचाखेचीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कोंडी सुरू केल्यानंतर ठाकरे महाविकास आघाडी राहण्याची किंवा ठेवण्याची कुठली गॅरेंटी नाही. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीतून अजितदादांना बाहेर काढण्यासाठी डावपेच रचले जात असल्याची भनक लागली. Vijay wadettiwar claims ajit pawar will not remain in mahayuti

    लोकसभा निवडणुकीच्या यानंतरच्या यशानंतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यशाचे आणि सत्तेचे डोहाळे लागले. पण त्यातूनच त्यांच्यात जागावाटपाची मोठी रस्सीखेच सुरू झाली. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायची मागणी फेटाळून लावली. उलट जागावाटपात त्यांच्या शिवसेनेची कोंडी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी राहण्याची गॅरेंटी उरली नाही. किंबहुना शरद पवारच उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत ठेवू इच्छित नाहीत, अशा बातम्या सगळीकडे पसरल्या.


    हायकोर्टाने 4 दहशतवाद्यांची फाशी जन्मठेपेत बदलली; पाटण्यात मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवला होता


     

    या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत फूट पडू नये यासाठी विजय वडेट्टीवार यांनी कोणत्या उपाययोजना केल्याचे दिसले नाही. पण त्यांना महायुतीतल्या भेगा मात्र मोठ्या दिसल्या. महायुतीतून अजितदादांना बाहेर काढण्यासाठी डाव खेळले जात असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. अजितदादांच्या फोटोवर शिवसैनिकांनी काळे कापड टाकले. लाडक्या बहिणी योजनेचा महायुतीत श्रेयवाद सुरू असल्याने तिन्ही घटक पक्ष एकमेकांविरोधात वागत आहेत. बारामतीतल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहिले देखील नाही, अशी एकापाठोपाठ एक उदाहरणे वडेट्टीवार यांनी आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी सांगितली.

    पण महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा तिढा कधी आणि कसा सुटणार??, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहणार की बाहेर पडणार की त्यांना महाविकास आघाडीतून पवार बाहेर काढणार??, याबद्दल वडेट्टीवर यांनी चकार शब्द काढला नाही.

    Vijay wadettiwar claims ajit pawar will not remain in mahayuti

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !