विशेष प्रतिनिधी
नागपूर : औद्योगिक क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरू असून विदर्भातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचे उद्योजक आकर्षित व्हावेत, त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करावी, यासाठी राज्यातल्या फडणवीस सरकारने पुढाकार घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.Vidarbha’s horse race in the industrial sector; Advantage Vidarbha 2026 MP inaugurates Industrial Festival
विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचे सरकार पुढे मोठे आव्हान आहे, पण हे आव्हान सरकारने अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने पेलले असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नावाजलेल्या उद्योगपतींना विदर्भात गुंतवणुकीसाठी आकर्षित केले आहे. त्यासाठीच “ॲडव्हांटेज विदर्भ” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून गणल्या गेलेल्या गडचिरोली जिल्ह्याची ओळख आता पोलाद नगरी म्हणून होत असून गडचिरोली जिल्ह्यात मोठमोठे उद्योगपतींनी मोठी गुंतवणूक केली आहे.
आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार सुमित वानखेडे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
– सत्यनारायण नुवाल यांचा सन्मान
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांचा मानपत्र देऊन सत्कार केला. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्यनारायण नुवाल यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजच्या कार्यक्रमात फडणवीस आणि गडकरी यांनी ‘असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, नागपूर’च्या युवा विंगच्या लोगोचे अनावरण केले.
Vidarbha’s horse race in the industrial sector; Advantage Vidarbha 2026 MP inaugurates Industrial Festival
महत्वाच्या बातम्या
- राज्याच्या औद्योगिक भविष्यासाठी भक्कम पायाभरणी; सर्व एक्सप्रेस वे आणि न्यू टाऊनच्या कामाला गती!!
- मोहब्बत की दुकान खोलून बसलेल्यांना मोदींची कबर खोदायला निघालेत!!, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेतून घणाघात
- Saif al-Islam Gaddafi : लिबियाचे माजी हुकूमशहा गद्दाफींच्या मुलाची हत्या; घरात घुसून गोळी मारली; निवडणूक लढण्याची तयारी करत होते
- Sonam Wangchuk : सुप्रीम कोर्टाने केंद्राला म्हटले-वांगचुक यांच्या जामिनावर विचार करा; त्यांची तब्येत ठीक नाही, तुरुंगात 5 महिने झाले