• Download App
    महाराष्ट्रात रेशन दुकानांमध्ये आता मिळणार भाजीपाला - फळे; मुंबई, ठाणे, पुण्यात पहिले प्रयोग!!|Vegetables and fruits will now be available in ration shops in Maharashtra; First experiment in Mumbai, Thane, Pune

    महाराष्ट्रात रेशन दुकानांमध्ये आता मिळणार भाजीपाला – फळे; मुंबई, ठाणे, पुण्यात पहिले प्रयोग!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील शिधावाटप दुकानांमधून भाजीपाला व फळांची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्याची सुरुवात मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून करण्यात येणार आहे. राज्यातील रास्तभाव रेशन दुकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.Vegetables and fruits will now be available in ration shops in Maharashtra; First experiment in Mumbai, Thane, Pune



    फळे भाजीपाला विकण्यास परवानगी 

    राज्यात 50 हजारांहून अधिक रास्तभाव दुकाने आहेत. केवळ अन्नधान्यांच्या विक्रीवर अवलंबून असणा-या या दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी विविध वस्तू, उत्पादने विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने आता नोंदणीकृत शेतकरी उत्पादन कंपनीस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानांमधून शेतक-यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी परवानगी देण्याचे सरकारने ठरवले आहे.

    सहा महिन्यांकरता परवानगी

    त्यानुसार राज्य शासनाने आता मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतील रास्तभाव दुकानांमधून भाजीपाला व फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरता परवानगी दिली. अन्न व नागरी पुरवठा विभागाने सोमवारी त्याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे.

    Vegetables and fruits will now be available in ration shops in Maharashtra; First experiment in Mumbai, Thane, Pune

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद? मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी; शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वादावादी

    Fadnavis : आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, देवेंद्र फडणवीसांचा टोला; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती

    Prakash Solanke’ : NCP आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला- निवडणुकीत चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं; इच्छुक असून उपयोग नाही, खर्चाची तयारी ठेवा