प्रतिनिधी
ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरला जोडे मारणाऱ्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आज सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यांचा निषेध करावा थोडा आहे, अशा प्रखर शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. Veer savarkar gaurav yatra : chief minister eknath shinde targets Uddhav Thackeray over rahul Gandhi insulted savarkar
शिवसेना – भाजपच्या सावरकर गौरव यात्रेला ठाण्यात ठाणे आणि मुंबईत आज जोरदार सुरुवात झाली. यापैकी ठाण्यातल्या यात्रेत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. या यात्रेच्या समारोपात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. ते म्हणाले, की सावरकरांचा अपमान केला म्हणून मणिशंकर अय्यर या काँग्रेसच्या मंत्र्याला बाळासाहेबांनी मुंबईच्या भर रस्त्यावर जोडे मारले होते. पण आज त्यांचेच वारस सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.
सावरकरांनी अंदमानात हालअपेष्टा भोगल्या. कोलू फिरवला. म्हणून आज आपण स्वातंत्र्य बघतो आहोत. त्यांचे कार्य महान आहे आणि त्यांच्या कार्याची ओळख महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये व्हावी यासाठी शिवसेना – भाजपने वीर सावरकर गौरव यात्रा काढली आहे. याची सुरुवात आज झाली आहे आणि संपूर्ण आठवडाभर महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सावरकर गौरव यात्रा सावरकरांच्या कार्याची माहिती महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेला देणार आहे.
तत्पूर्वी, आज मुंबई, ठाणे, दादर, मुलुंड परिसरामध्ये सावरकर गौरव यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईतील दादर परिसरात शिवसेना भवनजवळून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. त्यामध्ये भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यासह शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्याचबरोबर आत्ता सायंकाळी जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघात वीर सावरकर गौरव यात्रा सुरू झाली आहे.
Veer savarkar gaurav yatra : chief minister eknath shinde targets Uddhav Thackeray over rahul Gandhi insulted savarkar
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा