• Download App
    बारावीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून स्वीकारणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून वेळापत्रकाची घोषणाVarsha Gaikwad declared HSC exam 2022 application form submission schedule appeal students to apply online

    बारावीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून स्वीकारणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून वेळापत्रकाची घोषणा

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. Varsha Gaikwad declared HSC exam 2022 application form submission schedule appeal students to apply online

    आजपासून म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून परीक्षेसेसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. ऑनलाइन पद्धतीनं अर्ज दाखल करावेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली.

    दोन डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील

    परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२१ दरम्यान भरायची आहेत, असे पत्रकात नमूद आहे.

    Varsha Gaikwad declared HSC exam 2022 application form submission schedule appeal students to apply online

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !