वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बायपासनंतर ते तीन महिने विश्रांती घेणार असून यादरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने हेल्थ बुलेटिनही जारी करण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar Undergoes Bypass Surgery Yesterday
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बायपासनंतर ते तीन महिने विश्रांती घेणार असून यादरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने हेल्थ बुलेटिनही जारी करण्यात येणार आहे. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याची माहिती दिली. त्यांनी व्हिडिओ शेअर करून म्हटले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट
प्रकाश आंबेडकर यांनी कालच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत आपण तीन महिने कार्यरत राहणार नसल्याचं सांगितलं होतं. या काळात कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसून वैयक्तिक कारणासाठी तीन महिने सुटीवर जाण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar Undergoes Bypass Surgery Yesterday
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनावर ग्लेनमार्कचा येणार नेझल स्प्रे, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सना सुरुवात
- आनंदाची बातमी : पवित्र पोर्टलमधून लवकरच 6100 शिक्षणसेवकांची भरती, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात समाधानकारक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
- केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलावर शिवसेनेची टीका, ‘हा तर निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार!’
- कल्याण सिंग यांच्या निधनाची बातमी खोटी, तब्येतीत सुधारणा; हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा