• Download App
    Vanchit Bahujan Aghadi and Malegaon Secular Front announce to fight together in Malegaon; but Islam Party joins in!! मालेगावात वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढायची घोषणा; पण त्यात इस्लाम पक्ष सामील!!

    मालेगावात वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित लढायची घोषणा; पण त्यात इस्लाम पक्ष सामील!!

    Vanchit Bahujan Aghadi

    विशेष प्रतिनिधी

    मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट यांनी एकत्रित निवडणूक लढवायची घोषणा केली. पण याला सेक्युलर फ्रंट असे नाव दिले असले, तरी त्या फ्रंट मध्ये प्रत्यक्षात इस्लाम पक्ष सामील झाला. त्यामुळे मालेगावातल्या सेक्युलर आघाडी विषयी राजकीय संशय बळावला.Vanchit Bahujan Aghadi and Malegaon Secular Front announce to fight together in Malegaon; but Islam Party joins in!!

    आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.



    मालेगाव सेक्युलर फ्रंटमध्ये वंचित बहुजन आघाडी, इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टी यांचा सहभाग असून, आगामी महापालिका निवडणूक ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आघाडीच्या माध्यमातून मालेगाव शहराच्या विकासासाठी, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

    या युतीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत 12-15 जागा जाहीर करण्यात आल्या असून, काही जागांवर अजून चर्चा सुरू आहेत.

    युतीच्या घोषणेस माजी आमदार व इस्लाम पक्षाचे प्रमुख शेख आसिफ शेख रशीद, समाजवादी पार्टीचे प्रमुख व माजी नगरसेवक मुस्तकीम डिग्नीटी, डॉ. अखलाख, वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Vanchit Bahujan Aghadi and Malegaon Secular Front announce to fight together in Malegaon; but Islam Party joins in!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    आता उरले अदानींपुरते!!

    शरद पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना; कुठल्याच महापालिकांच्या राजकारणात पक्ष फिट बसेना!!

    पवार काका – पुतण्यांची युती फिस्कटली, म्हणून इतर पक्षांवर जाळे टाकायची तयारी!!