विशेष प्रतिनिधी
सातारा : जेसीबी लावा आणि औरंगजेबाची कबर उखडून टाका, अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी आज केली. अबू आजमी आणि अन्य लोकप्रतिनिधींनी औरंगजेबाचे महिमामंडन केले, त्याविषयी उदयनराजे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली. उदयनराजे यांनी आज जलमंदिर राजवाड्यात पत्रकार परिषद घेऊन छावा सिनेमा आणि त्या संदर्भात झालेल्या वादाबाबत आपली सविस्तर भूमिका मांडली.
– उदयनराजे म्हणाले :
– या देशात औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी पाहिजे??, तो परका लुटारू आणि क्रूर शासक होता. त्याच्या कबरीवर उरूस भरवले जात आहेत. त्याचे दैवतीकरण सुरू आहे. हा भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. असले प्रकार कायमचे थांबवण्यासाठी औरंगजेबाची कबरच उखडून फेकली पाहिजे. जेसीबी लावून कायमची कबर उखडून टाका.
– छत्रपती संभाजी महाराजांना शिर्के यांनी पकडून दिल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. तसे घडले असते तर आत्ता वेगवेगळ्या घराण्यांच्या सोयरीकी झाल्या असत्या का?? शासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अधिकृत चरित्रे प्रकाशित करावीत.
– शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा अपमान करणाऱ्या कुणालाही कठोरातली कठोर सजा होण्यासाठी याच अधिवेशनामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन कायदा मंजूर करावा. त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी ताबडतोब सुरू करावी. कोणालाही या कायद्यापासून सुटका मिळता कामा नये, अशी व्यवस्था करावी. निवडणुकीपुरती छत्रपतींची नावे घेऊन केवळ राजकारण करू नये.
Use JCB and demolish Aurangzeb’s tomb; Angry MP Udayanraje
महत्वाच्या बातम्या
- Suresh Dhas मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेला आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद!
- S Jaishankar : एस. जयशंकर यांनी काश्मीरबद्दल लंडनमध्ये असे काही म्हटले की, पाकिस्तान चवताळला!
- Babur Khalsa : ‘बाबर खालसाचा दहशतवादी महाकुंभात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होता’
- Tahawwur Hussain Rana : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा भारतात येण्यास घाबरतोय, कारण…