विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai 2006 Blasts : २००६च्या मुंबईतील साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीसाठी अपील केले होते.Mumbai 2006 Blasts
२१ जुलै रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने २००६ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने म्हटले की, सरकारी वकील आरोपींविरुद्धचा खटला सिद्ध करण्यात अपयशी ठरले.Mumbai 2006 Blasts
उच्च न्यायालयाने म्हटले की, आरोपींनी गुन्हा केला आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, म्हणून त्यांना निर्दोष सोडण्यात येत आहे. जर ते इतर कोणत्याही प्रकरणात नको असतील तर त्यांना तात्काळ तुरुंगातून सोडण्यात यावे.
न्यायालयाच्या आदेशानंतर, सोमवारी संध्याकाळी १२ आरोपींपैकी दोघांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले. यामध्ये एहतेशाम सिद्दीकी यांचा समावेश आहे, ज्याला २०१५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.
दुसरा आरोपी मोहम्मद अली जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. १२ पैकी एक असलेला नावेद खान हा नागपूर तुरुंगातच राहणार आहे. कारण तो हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अंडरट्रायल आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या साखळी स्फोटात १८९ जणांचा मृत्यू झाला होता
११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम उपनगरीय गाड्यांच्या सात डब्यांमध्ये साखळी स्फोट झाले. त्यात १८९ प्रवासी ठार झाले आणि ८२४ लोक जखमी झाले. हे सर्व स्फोट प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले. या घटनेनंतर १९ वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai 2006 Blasts: Govt Moves SC Against Acquittals; Hearing July 24,
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक
- जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेकांना सत्यपाल मलिकांची झाली आठवण; पण कुणालाही नाही आठवले मधू लिमये!!
- CoinDCX : CoinDCX वर सायबर हल्ला: 380 कोटींची चोरी, क्रिप्टो गुंतवणुकीतील धोक्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह
- ED Summons : सिद्धरामय्यांच्या पत्नीच्या खटल्यात ईडीचे अपील फेटाळले; सुप्रीम कोर्टाचा सवाल- राजकीय लढायांसाठी ईडीचा वापर का केला जातोय?