• Download App
    मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे नाही|Urban Development Minister Eknath Shinde is not in charge of the Chief Minister's post

    मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे नाही

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. मात्र, शिंदे यांनीच त्यावर खुलासा केला असून यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे सोशल मीडियात फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.Urban Development Minister Eknath Shinde is not in charge of the Chief Minister’s post

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्याने त्रस्त असल्याने उपचारासाठी ते एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. वरिष्ठ सर्जन यांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर छोटी शस्त्रक्रिया होईल, असे सांगण्यात येत आहे.



    पुढील साधारण दोन ते तीन दिवस मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिंदे यांनी त्याचा इन्कार केला आहे.

    दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. त्यात मानेच्या दुखण्याबाबत माहिती देतानाच त्यांनी कोविड लसीकरण मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

    करोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो, असे आवाहन या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी केले होते.

    Urban Development Minister Eknath Shinde is not in charge of the Chief Minister’s post

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल