• Download App
    UPSC Results : 761 विद्यार्थी उत्तीर्ण, शुभम कुमार प्रथम, दुसऱ्या क्रमांकावर जागृती अवस्थी, असा चेक करा निकाल । Upsc results declared total 761 students Passed, shubham kumar tops, jagriti awasthi second position Read How To Check Results

    UPSC Results : 761 विद्यार्थी उत्तीर्ण, शुभम कुमार प्रथम, दुसऱ्या क्रमांकावर जागृती अवस्थी, असा चेक करा निकाल

    Upsc results : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2020चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यावेळी एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. शुभम कुमारने नागरी सेवा परीक्षा, 2020 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तो पर्यायी विषय म्हणून मानव विज्ञानासह परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. शुभमने आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक (सिव्हिल इंजिनिअरिंग) मध्ये पदवी प्राप्त केली आहे. Upsc results declared total 761 students Passed, shubham kumar tops, jagriti awasthi second position Read How To Check Results


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा 2020चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यावेळी एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. शुभम कुमारने नागरी सेवा परीक्षा, 2020 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. तो पर्यायी विषय म्हणून मानव विज्ञानासह परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. शुभमने आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक (सिव्हिल इंजिनिअरिंग) मध्ये पदवी प्राप्त केली आहे.

    त्याचबरोबर महिला उमेदवारांमध्ये जागृती अवस्थी टॉप आहे. महिला व पुरुषांमध्ये मिळून तिने दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिने पर्यायी विषय म्हणून समाजशास्त्रासह परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ती MANIT भोपाळमधून B.Tech (Electrical Engineering) मध्ये पदवीधर आहे.

    टीना डाबीच्या बहिणीचा 15 वा क्रमांक

    त्याचबरोबर 2015 मध्ये UPSC परीक्षेत अव्वल आलेल्या टीना डाबीची बहीण रिया डाबी हिने 15वा क्रमांक मिळवला आहे. टीना डाबीने स्वतः याबद्दल पोस्ट करून माहिती दिली.

    या लिंकवरून चेक करा UPSC निकाल

    यूपीएससी नागरी सेवा निकाल 2021 असा करा चेक

    1. upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
    2. वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
    3. आता तुमच्या स्क्रीनवर एक PDF दिसेल.
    4. त्यात तुमचा रोल नंबर आणि नाव शोधा.
    5. जर तुमचा रोल नंबर आणि नाव त्यात असेल तर तुम्ही उत्तीर्ण आहात.
    6. तुम्ही डाउनलोड बटणावर क्लिक करून ही पीडीएफ सेव्ह करू शकता.

    केंद्रीय लोकसेवा आयोगाने अलीकडेच IAS आणि IFS भरतीच्या पूर्वपरीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. यावर्षी सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल. ही परीक्षा 19 सेवांसाठी घेतली जाईल. पहिली पूर्व परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती, नंतर ती कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आली.

    Upsc results declared total 761 students Passed, shubham kumar tops, jagriti awasthi second position Read How To Check Results

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे

    Election Commission : 22 कोटी मतदार ‘आधार’शी लिंक नाहीत, घरोघरी जाऊन पडताळणी; निवडणूक आयोगाची मोहीम