• Download App
    मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना : औरंगाबादेत मानवता परमो धर्म : मुस्लिम बांधवांनी दिला हिंदू मित्राला आधार ; पवित्र रमजानात 'राम नाम सत्य है' चा साक्षात्कार।UNITY IN DIVERSITY:Muslim brother helped hindu friend in Aurangabad ; done the antyasanskar of his son with hindu rituals

    मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना : औरंगाबादेत मानवता परमो धर्म । मुस्लिम बांधवांनी दिला हिंदू मित्राला आधार ; पवित्र रमजानात ‘राम नाम सत्य है’ चा साक्षात्कार

    हिंदू मित्राच्या मुलाच्या निधनानंतर मुस्लिम बांधवांनी दिला खांदा, पार पाडले अंत्यसंस्कार


    औरंगाबादमधली घटना, सगळ्यांकडून मुस्लिम बांधवांच्या कृतीचं कौतुक UNITY IN DIVERSITY:Muslim brother helped hindu friend in Aurangabad ; done the antyasanskar of his son with hindu rituals


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : देशात कोरोनाने भरलेल्या दहशतीमुळे सर्वच माणसं एकमेकांपासून अंतर राखत आहेत. सध्या कोरोनाच्या काळात लोक फक्त आपल्यापुरता विचार करताना दिसत आहेत. माणसाने केलेल्या अनेक कृती त्याच्या माणूस का म्हणायचं हा प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. लोक आपल्या लोकांनाही आधार देत नाहीत. मृत्यू झाला तर कुणी खांदाही द्यायला येत नाही असेही प्रकार घडले आहेत. मात्र औरंगबादमध्ये घडलेली घटना माणुसकीचं दर्शन घडवणारी ठरली आहे.



    एका बंगाली हिंदू कारागिराच्या अपंग मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांच्या मदतीला कुणीच नसल्याचे पाहून तिरडीला खांदा देण्यास काही मुस्लिम बांधव पुढे आले.

    औरंगाबादमध्ये एका हिंदू मित्राच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर प्रेतयात्रेला खांदा देण्यासाठी मुस्लिम बांधव पोहचले. त्यांनी हिंदू मित्राचं सांत्वन केलं, त्याच्या मुलाच्या प्रेतयात्रेला खांदा तर दिलाच पण स्मशानात जात अंत्यसंस्कारही पार पाडले. रमजान महिना सुरू असताना मुस्लिम बांधवांनी केलेलं हे कृत्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अनेकजण या मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक करत आहेत.

    आपल्या खांद्यावर प्रेत वाहून नेत या सगळ्या मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा एक नवा अध्याय लिहिला आहे. औरंगाबादच्या सिटी चौकात राहणारे दलाल हार्डी यांचा मुलगा सुबोधचा मृत्यू झाला. सुबोध पंधरा वर्षांचा होता. त्याच्या प्रेतयात्रेला कुणी पुढे येईना.. मग त्या भागात राहणारे हार्डी यांचे मित्र तिथे आले. त्यांनी या आपल्या मित्राच्या मुलाच्या प्रेतयात्रेला खांदा तर दिलाच शिवाय त्यांनी स्मशानात जाऊन अंत्यसंस्कारही पार पाडले.

    हार्डी यांचा मुलगा सुबोध जन्मल्यापासूनच अपंग होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर अनेक उपचार केले. मात्र अखेर मृत्यूने सुबोधला गाठलंच. सुबोधचा मृत्यू झाल्याची बातमी हार्डी यांच्या शेजाऱ्यांना समजली तेव्हा सगळेच मुस्लिम बांधव एकत्र आले त्यांनी सुबोधच्या प्रेतयात्रेला खांदा दिला आणि हिंदू स्मशानभूमीमध्ये जाऊन सुबोधच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने सगळे अंत्यसंस्कारही केले. औरंगाबादमध्ये आम्ही सगळेच मिळून मिसळून राहतो. हिंदू-मुस्लिम असा भेदाभेद करत नाही आम्ही एकमेकांच्या सुख दुःखात कायमच सहभागी होतो असं सुबोधच्या काकांनी आज तकला सांगितलं.

    बंगाली सुवर्ण कारागीर दुलाल घोडाई हे मागील २५ वर्षांपासून सराफा रोडवर फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन मुलं असून त्यातील एक सुभोह घोडाई हा १५ वर्षाचा दिव्यांग मुलगा. मागील काही वर्षांपासून तो आजाराने पलंगावरच पडून होता. त्याचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्याचा मृत्यू कोविडने झाला असावा या भीतीने परिसरातील व्यक्ती मदतीला आले नाहीत. मात्र, त्यांचे दोन – तीन नातलग आले. या बंगाली कारागिराने आधार कार्ड काढले नाही. घरीच निधन झाल्याने हॉस्पिटलमधील कागदपत्र नव्हते. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली जात नव्हती.

    ही माहिती दुलाल घोडाई यांचे मित्र नूर इस्लाम शेख यांना कळली. ते सुद्धा मूळचे कोलकाता येथीलच. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आलीम बेग यांना सोबत घेऊन घोडाई यांचे घर गाठले व त्यांना धीर दिला. सिटी चौक पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. मनपात जाऊन अंत्यसंस्काराची परवानगी आणली. दुपारी स्वर्गरथ आणला. हिंदू रीतीरिवाज पाळून पार्थिवाला अंघोळ घातली. तिरडी बांधली. घोडाई यांच्या नातेवाईकांसोबत पाच ते सहा मुस्लीम बांधवांनी तिरडीला खांदा दिला. अंत्ययात्रा कैलासनगर स्मशानभूमीत आणून पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दुलाल घोडाई यांनी अभिमानाने सांगितले की, नूर इस्लाम शेख, आलीम बेग हे माझे मित्रच नसून भाऊ आहेत. हे वाक्य ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

    UNITY IN DIVERSITY : Muslim brother helped hindu friend in Aurangabad ; done the antyasanskar of his son with hindu rituals

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस