• Download App
    पुण्यातील वाहतूक इथेनॉलवर झाली तर प्रदूषणाची समस्या सुटेल, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास|Union Minister Nitin Gadkari believes that if ethanol is used for transportation in Pune, the problem of pollution will be solved and rural economy of Maharashtra will change.

    पुण्यातील वाहतूक इथेनॉलवर झाली तर प्रदूषणाची समस्या सुटेल, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – पुण्यात तीन इथेनॉल पंप आहेत. त्यामुळे पुण्यातील वाहतूक इथेनॉलवर झाले तर प्रदूषणाची समस्या सुटेल. इथेनॉलनिर्मितीमुळे राज्यातील सुमारे 50 लाख युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. देशाला साडेचार हजार कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिल्यास ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.Union Minister Nitin Gadkari believes that if ethanol is used for transportation in Pune, the problem of pollution will be solved and rural economy of Maharashtra will change.

    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या ‘नवीन अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या विकासवाटा’ परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.



    नितीन गडकरी यांनी राज्यातील अतिरिक्त साखरेपासून इथेनॉलनिर्मिती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्यात पेट्रोलमध्ये 11 टक्के इथेनॉल वापरण्याचा निर्णय घेतला आहे . इथेनॉलनिर्मिती केवळ साखरेपुरती मर्यादीत न ठेवता तांदूळ, मका यापासून इथेनॉलनिर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. प्रदूषण ही मोठी चिंताजनक बाब आहे त्यामुळे आपल्याला ग्रीन हायड्रोजन तयार करायचे आहे. इथेनॉल हे पेट्रोल-डिझेल पेक्षा 10 पट चांगले इंधन आहे, शिवाय तुलनेत स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल आहे त्यामुळे ऑटो रिक्षा, स्कुटर इथेनॉल वर चालणाऱ्या आल्या तर फायदा होईल. नागपूर शहरातील बस एलएनजीमध्ये परिवर्तीत केल्याचे गडकरी यांनी सांगितले.

    फ्लेकस इंजिन पूर्णपणे जैविक इंधनावर चालणार. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. यासाठी राज्यातील जिल्हावार परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करण्याची आवश्यका आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

    Union Minister Nitin Gadkari believes that if ethanol is used for transportation in Pune, the problem of pollution will be solved and rural economy of Maharashtra will change.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस